भगवद गीता रहस्य मराठी | Tilak Bhagavad Geeta Rahasya PDF In Marathi

श्रीमद भगवद गीता रहस्य – Bhagawat Gita Rahasya PDF Free Download

गीता रहस्य के अध्याय

अध्याय पहिला: अर्जुनविषादयोग

१. धृतराष्ट्राचा संजयास प्रश्न. दुर्योधनाचें द्रोणाचार्यांजवळ उभयपक्षांच्या सैन्याचे वर्णन. युद्धारंभीं परस्परांच्या सलामीचा शंखनाद. अर्जुनाचा रथ पुढे नेऊन सैन्यनिरीक्षण.

दोन्ही सैन्यांत आपलेच बांधव, व त्यांना मारून कुलक्षय होणार, है पाहून अर्जुनास झालेला विपाद. कुलक्षयादि पातकांचे परिणाम. युद्ध न करण्याचा अर्जुनाचा निश्चय व धनुर्बाणत्याग.

अध्याय दुसरा: सांख्ययोग

श्रीकृष्णांचे प्रोत्साहन. अर्जुनाचें उत्तर, कर्तव्यमूढता व धर्मनिर्णपार्थ श्रीकृष्णास शरण जाणे. ११-१३. आत्म्याचें अशोच्यत्व.. देह आणि सुखदुःख यांचें अनित्यत्व. सदसद्विवेक व आत्म्याच्या नित्यत्वादि स्वरूपकथनानें त्याच्या अशोच्यत्वाचे समर्थन. आत्म्याच्या अनित्यत्वपक्षी उत्तर. सांख्यशास्त्राप्रमाणे व्यक्त भूतांचे अनित्व व अशोच्यत्व. आत्मा लोकांना दुर्ज्ञेय खरा; पण तूं खरें ज्ञान प्राप्त करून घेऊन शोक सोड.

अध्याय तिसरा – कर्मयोग

कर्मों सोडावी किंवा करावीं; खरें काय ? असा अर्जुनाचा प्रश्न सांख्य (कर्मसंन्यास ) व कर्मयोग अशा जरी दोन निष्ठा आहेत तरी कर्मे कोणालाच सुटत नसल्यामुळे कर्मयोग श्रेष्ठ ठरवून तोच आचरण्या बद्दल अर्जुनास निश्चित उपदेश. मीमांसकांचें यज्ञार्थ कर्महि आसक्ति सोडून करण्याबद्दल उपदेश, यज्ञचक्राचे अनादित्व व जगाच्या धारणार्थ अवश्यकत्व

ज्ञानी पुरुषाला स्वार्थ रहात नाहीं म्हणू नच प्राप्त झालेली कर्मे त्याने निःस्वार्थ म्हणजे निष्काम बुर्द्ध नें केलीं पाहिजेत; कारण कर्म कोणालाच सुटलें नाहीं. जनकादिकांचा दाखला: लोकसंग्रहाचे महत्व व भगवंताचा स्वतःचा दाखला;

अध्याय चवथा – ज्ञानकर्मसंन्यासयोग

कर्मयोगाची संप्रदाय परंपरा. जन्मरहित परमेश्वर दिव्य जन्म म्हणजे अवतार मायेर्ने कसे, केव्हां व कशासाठी घेतो याचें वर्णन. या दिव्य जन्माचें व कर्मानें तव जाणिल्यानें पुनर्जन्म सुटून भगवत्वाप्ति.

अन्यरीत्या भजेल तर तसे फल, उदा० इहलो कींच्या फलार्थ देवतोपासना. भगवंतांची चातुर्वर्ण्यादि निर्लेप कर्मों, त्यांतील तत्त्व ओळखण्याने कर्मबंधनाश व तशी कर्मे करण्यास उप देश. कर्म, अकर्म व विकर्म यांमधील भेद; अकर्म म्हणजे.

अध्याय पांचवा- संन्यासयोग.

संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ ? असा स्पष्ट प्रश्न, दोन्ही मोक्षपद पण त्यांतहि कर्मयोग श्रेष्ठ असें भगवंताचे निश्चित उत्तर.

संकल्प सोडिल्याने कर्मयोगी नित्यसंन्यासीच होतो, आणि कर्माशिवाय संन्यासहि सिद्ध होत नाहीं. सबब दोन्ही तत्वतः एकच. मन सदैव संन्यस्त; व कर्मे केवळ इंद्रियांचीं, असल्यामुळे कर्मयोगी सदा अलिप्त, शान्त व मुक्त, खरें कर्तृत्व व भोक्तृत्व प्रकृतीचें पण

अध्याय सहावा – ध्यानयोग.

फलाशा सोडून कर्तव्य करणाराच खरा संन्यासी व योगी. संन्यासी म्हणजे निरभि व अक्रिय नव्हे. कर्मयोग्याच्या साधनाव स्थेत व सिद्धावस्थेत शम व कर्म यांच्या कार्यकारणाची अदलाबदल व योगारूढाचे लक्षण.

योग सिद्ध करून घेण्यास आत्म्याचे स्वातंत्र्य. जितात्म योगयुक्तांमध्येहि समबुद्धीचा श्रेष्ठ. योगसा धनास लागणारें आसन व आहारविहार यांचें वर्णन.

योग्याचें आणि योगसमाधीतील आत्यांतिक सुखाचें वर्णन. मन हळू हळू समाधिस्थ, शान्त व आत्मनिष्ठ कसें करावें ? २७, २८. योगीच ब्रह्म भूत व अत्यंत सुखी.

योग्याची सर्वाभूतीं आत्मौपम्यबुद्धि. अभ्यास आणि वैराग्य यांनी चंचल मनाचा निग्रह.

अध्याय सातवा – ज्ञानविज्ञानयोग.

१-३. कर्मयोगा सिद्ध्यर्थ ज्ञानविज्ञाननिरूपणाला आरंभ. सिद्ध्यर्थं प्रयत्न करणारांची दुर्मिळता. क्षराक्षरविचार. भगवंतांची अष्टधा अपरा व जीव रूपी परा प्रकृति; त्यापासून पुढे सर्व विस्तार. विस्तारांतल्या सात्विकादि सर्व भागांत ऑवलेल्या परमेश्वरस्वरूपाचे दिग्दर्शन.

हीच परमेश्वराची गुणमयी व दुस्तर माया, व त्यालाच शरण गेल्यानें मायातरण. भक्त चतुर्विध; त्यांमध्ये ज्ञानी श्रेष्ठ, अनेक जन्मांनीं ज्ञानाची पूर्णता व भगवत्प्राप्तिरूप नित्य फल.

अनित्य काम्य फलार्थ देवतोपासना; पण त्यांतहि तत्तच्छ्रद्दाफलदातृत्व भगवंताचे भगवंताचें खरें स्वरूप अव्यक्त; पण मायेमुळे आणि द्वंद्वमोहामुळे दुर्जेय. मायामोहनाशानें स्वरूपज्ञान.

ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आणि अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ मिळून सर्वत्र एकच परमेश्वर हे जाणिल्यानें अखेरपर्यंत ज्ञानसिद्धि.

अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग

अर्जुनांच्या प्रश्नावरून ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधि दैव, अधियज्ञ व अधिदेह यांच्या व्याख्या. त्या सर्वात एकच ईश्वर.

अंतकाली भगवस्मरणानें मुक्ति. पण जॅ नित्य मनीं तेंच अंती; म्हणून सदाच भगवंताचे स्मरण करण्यास व लढण्यास उपदेश. अंतकाली परमेश्वराचें म्ह० ॐकराचे समाधिपूर्वक ध्यान व त्याचे फल. नित्य भगचिंतनाने पुनर्जन्मनाश. ब्रह्मलोकादि गति नित्य नव्हेत.

रूपी परा प्रकृति; त्यापासून पुढे सर्व विस्तार. विस्तारांतल्या सात्विकादि सर्व भागांत ऑवलेल्या परमेश्वरस्वरूपाचे दिग्दर्शन. हीच परमेश्वराची गुणमयी व दुस्तर माया, व त्यालाच शरण गेल्यानें मायातरण, १६-१९. भक्त चतुर्विध; त्यांमध्ये ज्ञानी श्रेष्ठ, अनेक जन्मांनीं ज्ञानाची पूर्णता व भगवत्प्राप्तिरूप नित्य फल २०-२३.

अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग

अर्जुनांच्या प्रश्नावरून ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधि दैव, अधियज्ञ व अधिदेह यांच्या व्याख्या. त्या सर्वात एकच ईश्वर. अंतकाली भगवस्मरणानें मुक्ति. पण जॅ नित्य मनीं तेंच अंती; म्हणून सदाच भगवंताचे स्मरण करण्यास व लढण्यास उपदेश.

अंतकाली परमेश्वराचें म्ह० ॐकराचे समाधिपूर्वक ध्यान व त्याचे फल. नित्य भगचिंतनाने पुनर्जन्मनाश. ब्रह्मलोकादि गति नित्य नव्हेत.

लेखक Bal Gangadhar Tilak
भाषामराठी
एकूण पृष्ठे 406
Pdf साइज़22.7 MB
Categoryधार्मिक(Religious)

Related PDFs

Bhagavad Gita PDF In Urdu

आदित्य हृदय स्तोत्र संपूर्ण पाठ PDF Hindi

श्रीमद भगवद गीता PDF In Hindi

श्रीमद भगवद गीता रहस्य ग्रन्थ – Srimad Bhagavad Gita Rahasya Pdf Free Download

1 thought on “भगवद गीता रहस्य मराठी | Tilak Bhagavad Geeta Rahasya PDF In Marathi”

  1. Hello,
    Ref : श्रीमद भगवद गीता रहस्य | Tilak Bhagavad Geeta Rahasya PDF Marathi
    I believe pages 15 and 16 of the original text seem to be missing. In other words, there should have been two more .tifs between 35.tif and 36.tif.
    Let me know if I can get those 2 pages.
    Thanks,
    R.P

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!