शिवलीलामृत कथा ग्रंथ | Shiv Lilamrut PDF In Marathi

‘शिवलीलामृत ग्रंथ मराठी’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘शिवलीलामृत ग्रंथ’ using the download button.

शिवलीलामृत कथा ग्रंथ – Shiv Lilamrut Book In Marathi PDF Free Download

शिवलीलामृत कथासार मराठी

याकरितां प्रदेशका ॥ अव्यगर पूजा इंदुमौकी । पूजा सांबुनि कदाकाळी ॥ सर्व काही न उठाें भवानीसी सनि केल्यासमाय । प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत । वाग्देवी वीणा वाजवीत । वेणु पुरोहित वावेसे अंबुजसमवलाल सांवरी। मार्गवी गातसे मपुरस्वरी । मृदंग वाजवी मधुकैटभारी । मृत्यगती ऐसा प्रदोष केळीचा महिमा ॥

अगोचर निगमागम मग काय बोलें उमा । मम पुत्र दरिद्री का झाला परान्ने जेव्हा दम्प यथार्थ । दुर प्रतियह दवा हस्त । स्सी अभिवार्थ मेत्र दग होत । मंत्रासी सामर्थ्य मग कैसे मग उमेने पुत्र दोन्ही । पावले रुमी चरणी । तेणे पंचाक्षर मंत्र उपदेशनी ॥

प्रदोषउत उपदेशिले तीन पटाखा झालिया रजनी । प्रदोषपूजा प्रभावी प्रीती करुनी ॥ गोमय भूमी सारवूनी ॥

दिव्यमजप यसपति शिवप्राणमित्र । हस्त जोडोनि आ समोर । यक्ष गंधर्व किन्नर । सुरासुर उभे असती तुझ्या पुर्व प्रतियह बहुत ॥

पूर्वी घेता दुष्ट अमित । दान केले नाही किंचित ॥ शिवचन न करी पक्षप्रदोष शनिप्रदोष । महिमा वर्णिला जाति विशेष । निराकार असा जयोदीस । दिवस सत्कर्म चित्र विधि विधान । कटीफ्तम इषडेकन । मडप की शोभायमान । रंगमाळा नानापरी ॥।

गुम उत्त नेसा आपण । शुभ गंध टासमन ॥ मग शिवलिंग स्थापूनः । पूजा करावी परिद गजानन । अष्टमहासिष्टि अष्टभैरव पूर्ण । अ्टदिक्यालपूजन सप्तावरणी सिवपूजा अयासाग शिवम्यान ॥ मग कराव पूजन राजीपचारै सर्व समर्पुन । करावे स्क्तवन शिा॥

जगजय गौरीनाय निर्मळ । जय जय कोटिचंद्र सुशीतळ । सव्विदानंदपन अबळ । पूर्णब्रहम सनालन २॥

ऐसे प्रदोषतत ऐकवून । बाळ उपदेशिल दोघेजण । मग ते एकमा करून । राहते ते एकी चार महिनेपर्यत । दोघेही आचरतीपदोस्त । गुस्वचने ययार्थ । शिवपूजन करिती शिवपूजा ने ट्यावी सर्वया । न देवी प्रसाद तीर्या । गलबत्महत्यांचे पाप मायं । होय सांगता शांडिल्य 108 सर्व पापाहूनि पाप थोर । शिवपूजेचा अपहार असो ते दोधे किशोर ॥

सदा सादर । शिवजनी ब्रह्मपुत्र शोधीत । एकला नीति कात । दरडी काता अकस्मात । ट्रायट सांपडला 11 पासी आला पेज ॥

लेखक रजनीकांत चांदवडकर-Rajanikant Chandwadkar
भाषामराठी
एकूण पृष्ठे 187
Pdf साइज़1.6 MB
CategoryReligious

उदाहारण हेतु मैंने यहा प्रथम अध्याय के ३० श्लोक दिए है

श्रीगणेशाय नमः ॥

धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥ सदा शिवलीलामृत श्रवण ॥ अर्चन सदा शिवाचे ॥१॥

सूत म्हणे शौनकादिकांप्रति ॥ जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ॥ त्यांच्या पुण्यास नाही मिती ॥ त्रिजगती तेचि धन्य ॥२॥

जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण ॥ त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ॥ तो शंकरचि त्याचे दर्शन ॥ घेता तरती जीव बहू ॥३॥

अथवा षोडश षोडश दंडी जाण ॥ बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ॥ शिखेमाजी एक बांधावा पूर्ण ॥ शिवस्वरूप म्हणवुनी ॥४॥

त्यावरोनि करिता स्नान ॥ तरी त्रिवेणीस्नान केल्यासमान ॥ असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण ॥ रुद्राक्ष बांधिजे आदरे ॥५॥

कंठी बांधावे बत्तीस ॥ मस्तकाभोवते चोवीस ॥ सहा सहा कर्णी पुण्य विशेष ॥ बांधिता निर्दोष सर्वदा ॥६॥

अष्टोत्तरशत माळ ॥ सर्वदा असावी गळा ॥ एकमुखी रुद्राक्ष आगळा ॥ पूजिता भाग्य विशेष ॥७॥

पंचमुख षण्मुख अष्टमुख ॥ चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ॥ सकळ मंत्र सुफळ देख ॥ रुद्राक्षजप नित्य करिता ॥८॥

नित्य रुद्राक्षपूजन ॥ तरी केले जाणिजे शिवार्चन ॥ रुद्राक्षमहिमा परम पावन ॥ इतिहास ऐका येविषयी ॥९॥

काश्मीर देशींचा नृप पावन ॥ नामाभिधान भद्रसेन ॥ विवेकसंपन्न प्रधान ॥ परम चतुर पंडित ॥१०॥

प्रजा दायाद भुसुर ॥ धन्य म्हणती तोचि राजेश्वर ॥ लाच न घे न्याय करी साचार ॥ अमात्य थोर तोचि पै ॥११॥

सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी ॥ पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी ॥ सुत सभाग विद्वान गुणी ॥ विशेष सुकृते पाविजे ॥१२॥

गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर ॥ शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ॥ वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार ॥ विशेष सुकृते लाहिजे ॥१३॥

श्रोता सप्रेम चतुर सावधान ॥ यजमान साक्षेपी उदार पूर्ण ॥ काया आरोग्य सुंदर कुलीन ॥ पूर्वसुकृते प्राप्त होय ॥१४॥

असो तो भद्रसेन आणि प्रधान ॥ बहुत करिता अनुष्ठान ॥ दोघांसी झाले नंदन ॥ शिवभक्त उपजतांचि ॥१५॥

राजपुत्र नाम सुधर्म ॥ प्रधानात्मज तारक नाम ॥ दोघे शिवभक्त निःसीम ॥ सावधान शिवध्यानी ॥१६॥

बाळे होऊनि सदा प्रेमळ ॥ अनुराग चित्ती वैराग्यशीळ ॥ लौकिकसंगे ध्रुव अमंगळ ॥ त्यांची संगती नावडे त्या ॥१७॥

पंचवर्षी दोघे कुमर ॥ लेवविती वस्त्रे अलंकार ॥ गजमुक्तमाळा मनोहर ॥ नाना प्रकारे लेवविती ॥१८॥

तव ते बाळ दोघेजण ॥ सर्वालंकारउपाधी टाकून ॥ करिती रुद्राक्ष धारण ॥ भस्म चर्चिती सर्वांगी ॥१९॥

आवडे सर्वदा एकांत ॥ श्रवण करिती शिवलीलामृत ॥ बोलती शिवनामावळी सत्य ॥ पाहाणे शिवपूजा सर्वदा ॥२०॥

आश्चर्य करिती राव प्रधान ॥ यासी का नावाडे वस्त्रभूषण ॥ करिती रुद्राक्षभस्मधारण ॥ सदा स्मरण शिवाचे ॥२१॥

विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती ॥ मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ॥ ते सवेचि ब्राह्मणांसी अर्पिती ॥ घेती मागुती शिवदीक्षा ॥२२॥

शिक्षा करिता बहुत ॥ परी ते न सांडिती आपुले व्रत ॥ राव प्रधान चिंताग्रस्त ॥ म्हणती करावे काय आता ॥२३॥

तो उगवला सुकृतमित्र ॥ घरासी आला पराशर ॥ सवे वेष्टित ऋषींचे भार ॥ अपर सूर्य तेजस्वी ॥२४॥

जो कृष्णद्वैपायनाचा जनिता ॥ त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता ॥ जो वसिष्ठाचा नातू तत्त्वता ॥ राक्षससत्र जेणे केले ॥२५॥

जेवी मनुष्ये वागती अपार ॥ तैसेचि पूर्वी होते रजनीचर ॥ ते पितृकैवारे समग्र ॥ जाळिले सत्र करूनिया ॥२६॥

जनमेजये सर्पसत्र केले ॥ ते आस्तिके मध्येचि राहविले ॥ पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले ॥ मग वाचले रावणादिक ॥२७॥

विरंचीस दटावूनि क्षणमात्रे ॥ प्रतिसृष्टि केली विश्वामित्रे ॥ तेवी पितृकैवारे पराशरे ॥ वादी जर्जर पै केले ॥२८॥

ते सांगावी समूळ कथा ॥ तरी विस्तार होईल ग्रंथा ॥ यालागी ध्वनितार्थ बोलिला आता ॥ कळले पाहिजे निर्धारे ॥२९॥

ऐसा महाराज पराशर ॥ ज्याचा नातू होय शुक योगींद्र ॥ तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार ॥ घरा आला जाणोनी ॥३०॥

Related PDFs

शिवलीलामृत कथा ग्रंथ – Shiv Lilamrut Book In Marathi PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!