षट्चक्र दर्शन | Shatchakra Darshan Ayurved PDF In Hindi

‘षट्चक्र दर्शन’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Shatchakra Darshan Ayurved’ using the download button.

षट्चक्र भेदन – Shatchakra Bhedan Pdf Free Download

षट्चक्र दर्शन

कठीण विषयाकडे वळावे लागते. मूलाधारादि षट्चक्रांचे वर्णन योगशास्त्रांत व बेदांतशासखत्रांत केले आहे, ते काल्पनिक असावे अशी शंका येते; नाभिकमल, हृत्कमल वगैरे कमले कमलाकार आहेत व त्यास दले म्हणजे पाकळ्या आहेत अशी नुसती भावना करावयाची की काय?

अशीही शंका येते; प्राण एक एक चक्रावरून वर जात जात शेवटी मस्तकांत जातो तो वायुरूपांत का शक्तिरूपांत जातो अशीही शंका येते; अशा अनेक शंका येणे साहजिक आहे. तरी या पट्चक्रांचे ज्ञान व रहस्य कळावे म्हणून हा अल्पसा प्रयत्न या पुस्तकरूपाने आम्ही करीत आहो.

‘प्रणवोपासना’ या ग्रंथामध्ये या चक्रांचा ओघरता उल्लेख आम्ही केला आहे. तिकडे लक्ष वेधून त्या ग्रंथाचे प्रस्तावनेत प्रसिद्ध वेदांती प्रो. रा. द. रानडे यांनी “या विषयाचे जास्त विस्तृत विवेचन अन्यत्र करावे” असे सूचित केले आहे. इस्लामपूर येथे ‘ब्राह्मण मासिक निघत असे.

त्यामध्ये ‘अजपाजप’ या शीर्षकाखाली आम्ही या विषयावर काही लेख लिहिले आहेत. ते मासिक कालचक्रामध्ये सापडल्यामुळे मध्यंतरी वर्ष दीड वर्ष बंद होते. त्यामुळे हे सर्व लेख ओळीने व एकत्रित फारच थोड्यांना वाचावयास सापडले असतील. पुढे हेही मासिक बंद झाले.

‘साधुसंतांचा देवयानपंथ’ या ग्रंथामध्येही आम्ही या विषयाचा थोडक्यांत उल्लेख केला आहे. अहमदनगरचे श्रीज्ञानेश्वरदर्शन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ या महत्त्वाचे ग्रंथांत आम्ही

“श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या अतिमानुषत्वाचे रहस्य” या लेखांत या विषयाचे थोडे जास्त दिग्दर्शन केले आहे. असो. निर्गुण, निराकार, परेच्या पलीकडील, सच्चिदानंदरूप अशा सहस्रदलकमलामध्ये स्थित असलेल्या प्रकाशरूप व परब्रह्मस्वरूपी सद्गुरुपदाचे ठिकाणी एकात्मभावाने लीन असो!

अध्यात्मविद्येच्या मार्गावर असणाऱ्यांना, वेदांतशास्त्रांत पारंगतता मिळविणाऱ्यांना व आत्मस्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त करून घेणाऱ्या अभ्यासी पुरुषांना षट्चक्रभेदन पंच कर्मेद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये व मनबुद्धघादिक

इत्यादिकांचा नियंता व प्रेरक आणि ज्याचे वास्तव्य मूलाधार चकावर मानले आहे अशा आत्मरूप बुद्धिदात्यास नमन असो! त्याचप्रमाणे हंसावर आरूढ होणारी प्रणवरूपिणी वाग्देवता तिलाही वंदन असो!

स्थान ( Position)

मूलाधार हे चक्र शिवणीचे ठिकाणी आहे असे सांगितले याचा अर्थ शिवणीचे कातड्याचे बाहेरचे अगर आंतील अंगास ते आहे असा न धरतां, शाखाचन्द्रन्यायाने शिवण हे उपलक्षण धरून त्याचे अनुरोधाने कटिप्रदेशांत वास्तव्य करीत असलेल्या ज्ञानचक्राचे लक्ष्य घरले पाहिजे.

शुद्ध पक्षांतील द्वितीया अगर तृतीया या दिवशी चंद्राची कोर सूक्ष्म असते.

ती कित्येकांना दिसत नाही. ती दाखवायची असली म्हणजे जाणता माणूस प्रथम एखाद्या झाडाच्या फांदीजवळ चंद्र येईल अशा बेताने.

ज्यास चंद्रदर्शन करावयाचे आहे, अशा माणसास घेऊन उभा रहातो. प्रथम चंद्र दाखवण्यापूर्वी त्यास झाडाची शाखा दाखवितो.

नंतर त्या शाखेच्या अनुरोधाने दूरवर आकाशांत पहाण्यास सांगतो. शासेच्या अनुरोधाने दूरवर पाहिले म्हणजे पहाणारास चंद्रदर्शन होते ह्यास शाखाचंद्रन्याय असे म्हणतात. ह्यास अनुसरून मूलाधार चक्र हे गुद व मेढ यामध्ये आहे.

शिवणीचे ठिकाणी आहे, इत्यादि वर्णनांत शिवण ही शाखेचे ठिकाणी घ्यावी व तदनुरोधाने दृष्टांतांतील लक्ष्य चंद्राचे ठिकाणी कल्पिलेल्या आंतील आधारचक्रावर लक्ष्य ठेवावे.

म्हणजे ह्या चक्राचे ज्ञान होईल. हा विस्तृत दृष्टांत येथे देण्याचे कारण असे की, पुढेही स्वाधिष्ठान, नाभिकमल वगैरे चक्रांचे वर्णन येईल.

त्याठिकाणी ‘लिंगाचे ठिकाणी अगर नाभीचे ठिकाणी ही चक्रे आहेत’ असे म्हटले म्हणजे, त्या त्या बाह्यप्रदेशी ती चक्रे आहेत असा अर्थ न घेता शाखाचन्द्रन्यायाने पोटांत कण्याचे पुढील भागी असणाऱ्या ठिकाणीच ती आहेत, असा अर्थ घ्यावयास पाहिजे.

ह्या गर्भितार्थाकडे लक्ष न दिल्यामुळे म्हणा अगर हा अर्थ न कळल्यामुळे म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा, कित्येक अनभिज्ञ लोक या मार्गाची हेटाळणी करितात. अगर चक्रांचे वर्णन काल्पनिक आहे, काव्यमय आहे असे मानतात.

पण ही विचारसरणी भ्रमाची व चुकीची आहे. विषयावर श्रद्धा ठेवून विषयामध्ये खोल शिरून त्यांतील मर्म जाणण्याकडे बुद्धि खर्च केली म्हणजे सर्व गोष्टींचा उलगडा आपोआप होतो.

ही चक्रे काल्पनिक नसून त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते असे पूर्वाचार्यांनी व अनुभवी सत्पुरुषांनी लिहून ठेविले आहे.

हे प्रमाण सत्य आहे. हे पुढील तुलनात्मक शरीरशास्त्राचे आधाराने तसेच बुद्धिप्रामाण्यास पटेल अशा तऱ्हेने केलेल्या विवेचनावरून कळून येईल. एकाग्र आणि सूक्ष्म अशा बुद्धीच्या योगाने सूक्ष्मदृष्टि मनुष्यांना त्याचे ज्ञान होते!

दृश्यते त्वया बुद्धया सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः

कठोपनिषद् १:३:१२

विषयवासना जिंकल्यावर मग जगांत काय जिंकावयाचे राहिले? ती जिंकणारास काही प्राप्त होते. वं बीजाचे केवढे हे महत्त्व! शं हे बीज डावे बाजूचे पाकळीमध्ये, षं हे वरचे बाजूचे पाकळीत व सं हे पुढचे पाकळीत स्थित आहे.

ह्या प्रत्येक दलांत एक एक शक्ति वास्तव्य करिते. गुप्ता, प्रासका, कराळा व विकराळा अशा त्या अनुक्रमे होत. ह्या प्रत्येक शक्तीपासून निरनिराळ्या आनंदाची प्राप्ति होते. परमानंद, सहजानंद, वीरानंद, योगानंद असे अनुक्रमाने आनंद त्या त्या शक्त्यानुरूप आहेत.

पहिली गुप्ता ही शरीरांतील गुद व योनी यासारख्या गुप्त इंद्रियांना जीवन देते म्हणून तीस गुप्ता असे म्हणतात. ह्या गुप्त शक्ति कह्यांत आल्या म्हणजे त्यापासून परमानंद सुखाची प्राप्ति होते. याचप्रमाणे सर्व शक्तींचे समजावे.

या मूलाधार चक्राचे ठिकाणी अपान वायूचे भ्रमण आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही कार्यांत विघ्नहरण व्हावे म्हणून प्रथमारंभी श्रीगजाननाचे स्मरण करतात, त्याप्रमाणे या आधार चक्राचे ठिकाणी गजानन देवतेचे अधिष्ठान आहे असे मानल्यास ते योग्य नव्हे काय ?

उलट असे म्हणतां येईल की, प्राण्यांच्या व शक्तीच्या उगमस्थानी गजानन देवता कल्पिल्यामुळे त्याच देवतेस सर्व व्यवहारामध्ये प्रथमारंभी नमन करण्याची वहिवाट आहे!

या चक्राचे ठिकाणी ध्यान केले असतां व श्रीगजाननाचे स्मरण केले असता मंगल प्राप्त होते. म्हणून याठिकाणी सप्त वारांपैकी मंगळवाराची कल्पना केली आहे.

लेखक श्रीपाद महादेव वैध-Sripad Mahadev Vaidh
भाषा हिन्दी
कुल पृष्ठ 162
Pdf साइज़4 MB
Categoryआयुर्वेद(Ayurveda)

Related PDFs

Kayachikitsa All Volume PDF In Hindi

ध्यान से चिन्ता निवारण PDF In Hindi

रस तंत्र सार व सिद्ध प्रयोग संग्रह PDF In Hindi

जल चिकित्सा (पानी का इलाज) PDF In Hindi

Ayurveda Philosophy PDF In Hindi

षट्चक्र दर्शन व भेदन – Shatchakra Darshan Va Bhedan Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!