षट्चक्र भेदन – Shatchakra Bhedan Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक का एक मशीनी अंश
कठीण विषयाकडे वळावे लागते. मूलाधारादि षट्चक्रांचे वर्णन योगशास्त्रांत व बेदांतशासखत्रांत केले आहे, ते काल्पनिक असावे अशी शंका येते; नाभिकमल, हृत्कमल वगैरे कमले कमलाकार आहेत व त्यास दले म्हणजे पाकळ्या आहेत अशी नुसती भावना करावयाची की काय?
अशीही शंका येते; प्राण एक एक चक्रावरून वर जात जात शेवटी मस्तकांत जातो तो वायुरूपांत का शक्तिरूपांत जातो अशीही शंका येते; अशा अनेक शंका येणे साहजिक आहे. तरी या पट्चक्रांचे ज्ञान व रहस्य कळावे म्हणून हा अल्पसा प्रयत्न या पुस्तकरूपाने आम्ही करीत आहो.
‘प्रणवोपासना’ या ग्रंथामध्ये या चक्रांचा ओघरता उल्लेख आम्ही केला आहे. तिकडे लक्ष वेधून त्या ग्रंथाचे प्रस्तावनेत प्रसिद्ध वेदांती प्रो. रा. द. रानडे यांनी “या विषयाचे जास्त विस्तृत विवेचन अन्यत्र करावे” असे सूचित केले आहे. इस्लामपूर येथे ‘ब्राह्मण मासिक निघत असे.
त्यामध्ये ‘अजपाजप’ या शीर्षकाखाली आम्ही या विषयावर काही लेख लिहिले आहेत. ते मासिक कालचक्रामध्ये सापडल्यामुळे मध्यंतरी वर्ष दीड वर्ष बंद होते. त्यामुळे हे सर्व लेख ओळीने व एकत्रित फारच थोड्यांना वाचावयास सापडले असतील. पुढे हेही मासिक बंद झाले.
‘साधुसंतांचा देवयानपंथ’ या ग्रंथामध्येही आम्ही या विषयाचा थोडक्यांत उल्लेख केला आहे. अहमदनगरचे श्रीज्ञानेश्वरदर्शन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ या महत्त्वाचे ग्रंथांत आम्ही
“श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या अतिमानुषत्वाचे रहस्य” या लेखांत या विषयाचे थोडे जास्त दिग्दर्शन केले आहे. असो. निर्गुण, निराकार, परेच्या पलीकडील, सच्चिदानंदरूप अशा सहस्रदलकमलामध्ये स्थित असलेल्या प्रकाशरूप व परब्रह्मस्वरूपी सद्गुरुपदाचे ठिकाणी एकात्मभावाने लीन असो!
अध्यात्मविद्येच्या मार्गावर असणाऱ्यांना, वेदांतशास्त्रांत पारंगतता मिळविणाऱ्यांना व आत्मस्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त करून घेणाऱ्या अभ्यासी पुरुषांना षट्चक्रभेदन पंच कर्मेद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये व मनबुद्धघादिक
इत्यादिकांचा नियंता व प्रेरक आणि ज्याचे वास्तव्य मूलाधार चकावर मानले आहे अशा आत्मरूप बुद्धिदात्यास नमन असो! त्याचप्रमाणे हंसावर आरूढ होणारी प्रणवरूपिणी वाग्देवता तिलाही वंदन असो!
लेखक | श्रीपाद महादेव वैध-Sripad Mahadev Vaidh |
भाषा | हिन्दी |
कुल पृष्ठ | 162 |
Pdf साइज़ | 4 MB |
Category | आयुर्वेद(Ayurveda) |
षट्चक्र दर्शन व भेदन – Shatchakra Darshan Va Bhedan Book/Pustak Pdf Free Download