दिव्य मराठी कुरआन | Marathi Quran Book PDF

कुराण मराठी- Marathi Quran PDF Free Download

कुरआन से लिए कुछ शब्द

निःसंशय पवित्र कुरआन, सर्वश्रेष्ठ अल्लाहतर्फे संपूर्ण मानवजातीच्या हित कल्याणासाठी, जीवनयापनात मानवाचे यथायोग्य आणि सर्वंकष मार्गदर्शन करण्यासाठी अवतिरत केला गेलेला अंतिम ग्रंथ आहे.

अर्थात त्याला स्थळ-काळाची मर्यादा नाही आणि तो एका विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांपुरता मर्यादित नाही. समस्त मानवांना अल्लाहनेच निर्माण केले आहे तद्नुषंगे प्रत्येक मानवाला कुरआनाच्या माध्यमाने आपल्या रचयित्या स्वामी व पालनकर्त्या अल्लाहशी नाते जोडणे आवश्यक आहे, किंबहुना हे त्याच्या हिताचेच आहे.

पवित्र कुरआनासंदर्भात ज्या लोकांच्या मनात शंका-कुशंका आहेत, अनेक गैरसमज आहेत ते केवळ अज्ञानापायी आणि परंपरागत द्वेषबुद्धीमुळे.

त्यांनी जर विशुद्ध मनाने आणि पूर्वग्रहविरहित बुद्धीने कुरआनाचा अभ्यास केला तर निश्चितच त्यांच्या शंका-कुशंका व गैरसमज दूर होतील.

मग सत्याच्या प्रखर प्रकाशाने त्यांचे मन-मस्तिष्क तेजोमय होईल, परिणामी असत्यरूपी अज्ञानाचा अंधकार क्षणार्धात नाहीसा होईल, आणि उत्स्फूर्तपणे ते अल्लाहकडे धाव घेतील.

इस्लाम स्वीकृतीपूर्वी मी अनेक इस्लामी ग्रंथांचा अभ्यास केला, त्यात कुरआनाचे अनेकविध भाष्य आणि अनुवाद यांचा समावेश अधिक होता.

मौलाना मुहम्मद जुननागढी यांचा अनुवाद ‘अहसनुल बयान’ आजपावेतोच्या अध्ययनात विशेष जाणवला. कारण तौहिद (एकेश्वरवादा) संदर्भात ‘अहसनुल बयान’ने अनेक विवरणात्मक टीपा दिलेल्या आहेत.

अर्थात तौहिद हा कुरआनाचा, पर्यायाने इस्लामचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणूनच मी दारुस्सलामच्या वरिष्ठांना सातत्याने ही विनंती करीत राहिलो की या ग्रंथाचा मराठी अनुवाद व्हायला हवा.

तशी ती काळाची गरजही आहे, परंतु आपण मराठीशी अनभिज्ञ असल्याचे सांगून वरिष्ठांनी सुरुवातीला मनावर घेतले नाही.

तथापि मी ध्येयाचा पाठपुरावा करीत राहिलो, शेवटी अल्लाहच्या असीम कृपेने दारुस्सलामच्या वरिष्ठांनी माझी विनंती मान्य करून या महान कार्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली.

सूरह फातिहा – १

सूरह फातिहा मक्का येथे अवतरीत झाली. यात सात आयती आहेत.

१. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे.

२. सर्व स्तुति प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार’ आहे.

३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे.

४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे.

५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो.

६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव.

७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा.

सूरह बकर:- २

सूरह बकरः मदीना येथे अवतरीत झाली. यात दोनशे श्याऐंशी आयती आणि चाळीस रुकुउ आहेत.

अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे.

१. आलिफ, लाम, मीम.

२. या ग्रंथा (चे अल्लाहचा ग्रंथ असण्या) बाबत कसलीही शंका नाही, अल्लाहच्या आज्ञाभंगाचे भय राखणाऱ्यांना मार्गदर्शन करणारा आहे.

३. जे लोक न पाहिलेल्या (परलोका) वर ईमान राखतात आणि नमाजला कायम करतात आमि आम्ही प्रदान केलेल्या (धन संपत्ती) मधून खर्च करतात.

४. आणि जे लोक ईमान राखतात त्यावर, जे तुमच्याकडे उतरविले गेले आणि जे तुमच्यापूर्वी उतरविले गेले. आणि ते आखिरतवरही अटळ विश्वास राखतात.

५. हेच लोक आपल्या पालनकर्त्याच्या तर्फे खऱ्या मार्गावर आहेत, आणि हेच लोक सफलता (आणि मुक्ती) प्राप्त करणारे आहेत.

६. निःसंशय, इन्कार करणाऱ्यांना तुम्ही भय दाखवा किंवा दाखवू नका सारखे आहे, हे लोक ईमान राखणार नाहीत.

७. सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्या हृदयांवर आणि कानांवर मोहर लावली आहे. आणि त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडला आहे. आणि त्यांच्याकरिता मोठा भयंकर अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

सूरह निसा ४

सूरह निसा मदीना येथे अवतरली आणि यात एकशे शहात्तर आयती आहेत आणि चोवीस रुकुउ आहेत.

अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा मेहरबान आणि दयावान आहे.

१. हे लोकांनो! आपल्या त्या पालनकर्त्याचे भय राखा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासूनच त्याच्या पत्नीलाही निर्माण केले,

आणि त्या दोघांपासून अनेक स्त्री-पुरुष पसरविले आणि त्या अल्लाहचे भय राखा, ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकांकडे याचना करतात आणि नाते-संबंध तोडण्यापासूनही (स्वतःला) वाचवा) निःसंशय, अल्लाह तुम्हा सर्वांची देखरेख करणारा आहे.

(१) या आयतीत ग्रंथधारकांच्या त्या समूहाबाबत उल्लेख आहे, ज्यांना पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या प्रेषित्वावर ईमान राखण्याचे सद्भाग्य प्राप्त झाले.

त्यांचे ईमान आणि ईमानाच्या गुणविशेषांचे वर्णन करून सर्वश्रेष्ठ अल्लाहने इतर ग्रंथधारकांपेक्षा त्यांना उत्तम ठरविले.

(अल्लाहकरिता परिपूर्ण आत्मसमर्पण) आणि ज्यांना ग्रंथ दिला गेला, त्यांनी ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर आपसातील द्रेष-मत्सरामुळे मतभेद केला आणि जो अल्लाहच्या आयतींना (पवित्र कुरआनाला) न मानेल तर अल्लाह लवकरच हिशोब घेईल.

२०. जर ते तुमच्याशी भांडण-तंटा करतील तर तुम्ही सांगा की मी आणि माझ्या अनुयायींनी स्वत:ला अल्लाहकरिता समर्पित केले आणि तुम्ही ग्रंथधारक व अशिक्षित लोकांना सांगा की काय तुम्ही इस्लामचा स्वीकार केला आहे.

जर ते इस्लामचा स्वीकार करतील तर त्यांनी सरळ मार्ग प्राप्त करून घेतला आणि जर तोड फिरवतील तर तुमची जबाबदारी केवळ (संदेश) पोहचविण्याची आहे. आणि अल्लाह आपल्या दासांना स्वतःच पाहत आहे.

२१, नि:संशय, जे लोक अल्लाहच्या आयतींचा इन्कार करतात आणि अल्लाहच्या पैगंबरांची नाहक हत्या करतात आणि जे लोक न्यायाची गोष्ट बोलतात त्यांचीही हत्या करतात. तर (हे पैगंबर!) तुम्ही त्यांना फार मोठ्या अज़ाय ( शिक्षा-यातने ) ची सूचना द्या.

२२. त्यांची सर्व सत्कर्मे या जगात आणि आरिब्ररतमध्ये वाया गेलीत. आणि त्यांचा कोणीही सहाय्यक (मदत करणारा) नाही.

२३. काय तुमही नाही पाहिले ज्याना ग्रंथथाचा एक भाग दिला गेला आहे ते आपल्या आपसातील फैसल्याकरिता अल्लाहच्या प्रथाकडे बोलाविले जातात, तरीदेखील त्यांच्यातला एक समूह तोंड फिरवून परत जातो.

२४. याला कारण त्याचे असे म्हणणे आहे की त्यांना काही मोजकेच दिवस आग स्पर्श करील. या त्यांच्या मनाने रचलेल्या गोष्टींनी त्यांना त्यांच्या दीन (धर्मा) बाबत धोक्यात टाकलेले आहे.

लेखक मुहम्मद शफी अंसारी-Muhammad Shafi Ansari
भाषामराठी
एकूण पृष्ठे 773
PDF साइज़14.1 MB
CategoryReligious

Related PDFs

मराठी कुरआन – Marathi Quran Pdf Free Download

1 thought on “दिव्य मराठी कुरआन | Marathi Quran Book PDF”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!