ययाति कादंबरी – Yayati Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
माझी कहाणी मी का सांगत आहे? माझे मलाच नीट कळत नाही. मी राजा आहे, म्हणून का मी हे सारे सांगत आहे? मी राजा आहे? छे! होतो.
राजे-राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात. त्यांच्या प्रेमकथांत तर जगाला फार-फार गोडी वाटते. मोठेमोठे कवी त्या कथांवर काव्ये रचतात.
माझी कहाणी हीसुद्धा एक प्रेमकथा- छे । ती कसली कथा आहे, कुणाला ठाऊक! एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही, हे मला कळते,
पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही. या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही, प्रदर्शन नाही.
शेल्याची लक्तरे आहेत ही; त्यांत प्रदर्शन करण्यासारखे काय आहे? राजाच्या पोटी मी जन्माला आलो, म्हणून राजा झालो, राजा म्हणून जगलो.
यात माझा गुणदोष नाही. हस्तिनापुरच्या नहुषमहाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला. पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी. त्यात कसले आहे मोठेपण?
राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडेसुद्धा लोक कौतुकाने पाहतात! राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो, तर माझे जीवन कसे झाले असते?
शरद ऋतूतल्या नृत्यमग्न चांदण्या रात्रीसारखे, की शिशिरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे? कुणी सांगावे? आश्रमात जन्माला येऊन मी अधिक सुखी झालो असतो? छे।
या प्रश्नाचे उत्तर शोधशोधूनही मला मिळत नाही. एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते. कदाचित माझी जीवनकहाणी अगदी साधी झाली असती-
एखाद्या वल्कलासारखी अनेक रंगानी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्राचे रूप तिला कधीच आले नसते; पण त्या वस्त्राचे सारेच रंग काही मला सुखद वाटत नाहीत.
असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झाली आहे, ते का? या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे ? जखम उघडी करून दाखविली, म्हणजे माणसाचे दुःख हलके होते.
कुणी जवळ बसून विचारपूस केली, की आजायाला बरे वाटते. आपुलकीच्या अश्रूनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वणवा विझतो. मलासुद्धा ते अशुरूच हवे आहेत का ? ते काही असो.
एक गोष्ट सत्य आहे. या कहाणीने माझे मन भरून गेले आहे! आषाढातल्या ढगाळ आभाळासारखे। रातदिवस मी विचारच विचार करीत आहे. ही कहाणी ऐकन एखाद्याला आयुष्याच्या मागांतले खाचखळगे दिसतील,
लेखक | विष्णु खांडेकर-Vishnu Khandekar |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 351 |
Pdf साइज़ | 3.55 MB |
Category | कादंबरी(Novels) |
Also Read
ययाति – Yayati In Marathi Book/Pustak PDF Free Download