शिवाजी कोण होता | Shivaji Kon Hota PDF In Marathi

शिवाजी कोण होता – Shivaji Kon Hota Book/Pustak PDF Free Download

शिवाजी के बारे में

शहेनशहा औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्याला जावे लागले. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना.

पुन्हा शक्कल लढवली गेली अन् महाराज पसार झाले. पसार होताना बिछान्यावर एकजण शिवाजीचे सोंग घेऊन झोपला होता अन् एकजण त्याचे पाय चेपत होता.

पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडकीस यायला उशीर व्हावा अन् मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती.

मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते मदारी म्हेतर अन् हिरोजी फर्जद. लवकर असो अगर उशिरा असो डाव उघडकीस येणार, आपण पकडले जाणार, अन् बेमौत मारले जाणार, याची मदारी म्हेतरला अन् हिरोजी फर्जदला जाण नव्हती?

मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर. शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचे आहे. ते पूर्ण व्हायला हवे, टिकायला हवे, आपण मेलो तरी चालेर् हीच ती भावना.

आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं, अशी किमया शिवाजीराजे करू शकले. इतर राजांना ते शक्य नव्हते.

इतर राजांसाठीही लढणारे होते, नाही असं नाही. अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले पण त्यांचं लढणं हे मर्दुमकी गाजवून जहागिरी अन् इनाम मिळवण्यासाठी होतं.

ते मेले ते जहागिरीसाठी अन् इनामासाठी, उदात्त कार्यासाठी नव्हे. शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच परंतु सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परीनं सहभागी होती आणि हे फार महत्त्वाचं होतं.

राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं.

खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर सर्व रथतेचं असत शिवकार्यात लढवय्ये सैनिक तर सहभागी होतेच परंतु सर्वसामान्य रयतसुद्धा आपल्या परीनं सहभागी होती आणि हे फार महत्त्वाचं होतं.

राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं. खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर सर्व रथतेचं असतं आणि म्हणूनच यशस्वी होतं! रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचं ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान

लेखक गोविंद पानसरे-Govind Pansare
भाषामराठी
एकूण पृष्ठे 82
Pdf साइज़11.2 MB
Categoryजीवनचरित्र(Biography)

और पढ़े:

शिवाजी कोण होता – Shivaji Kon Hota Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *