शिवाजी महाराज भाषण मराठी | Shivaji Maharaj Bhashan In Marathi PDF

‘शिवजयंती भाषण’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Shivaji Maharaj Speech’ using the download button.

छत्रपति शिवाजी महाराज जयंती भाषण – Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Speech Marathi PDF Free Download

शिवाजी महाराज भाषण

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही तर अखील भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे.

त्यांनी पारतंत्र्यातून स्वातं त्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्मान केला.

कोणत्याही कार्याचा आरंभ लहानश्या मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादेत गेलेले आढळते.

पवित्र गंगेचा उगम आणि पुढे तिचा झालेला विस्तार हे उदाहरण या दृष्टीने ल्काहात घेण्या सारखे नाही कां ? तर शिवाजी महाराजांचे कार्य जरी आरंभी महाराष्ट्राच्या परतंत्रे विषयीचा विरोध प्रगट करून स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नान पुरता मर्यादित वाटला तरी लोकांच्या मनात जी स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत पेटली त्यामुळेच पुढे भारतात द्क्षिणोत्तर ती प्रेरणा निर्माण झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता.

त्यांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तुत्वाने सामर्थवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याचा उन्मेष बाळगणार्या माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला.

तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी सत्ता संप्विनार्या परधर्मी परकीय सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर पुढे दोन तीनशे वर्षे सत्ता गाजविली.

जसजशी त्यांची सत्ता मजबूत होत गेली तसतशी त्यांच्यातली जुलमी प्रवृत्ती वाढीला लागली.

आपल्या प्रजेवर अन्यायाचे कर लादणे, त्यांची घरेदारे आणि जमिनी ब्ल्काव्ने, स्त्रियांची अब्रू लुटणे, आणि गुलाम म्हणून प्रजेला राबविणे.

असे प्रकार सुरु झाले. सारी मराठी माण या जुलसेमी सत्तेवर रागावली होती. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.

तशी अवस्था झाली होती. स्वदेश स्वतंत्र व्हावा हि माता-पित्याची ईच्छा शिवाजींनी पूर्ण केली.

हिंदू धर्माचा पाडाव करून सर्व हिंदुस्थान मुसलमानमय करून टाकावा या म्ह्त्वाकांक्षेने झपाटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता.

विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अस्या वेढ्यात सापडलेला पुणे-सुपे परिसर या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबांची हुकुमत होती.

तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता.

माता जिजाउ न्नि शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तींचा विरोध आणि चीड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयीच्या निष्ठा निर्माण केल्या.

शिवाजी राज्यांच्या अंगभूत गुणांचा विकास केला. आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले.

मराठी माणसाच्या मनातील रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा’ हे सूत्रे धरून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले.

यावेळी त्यांच्या लक्षात आले कि काही मराठी माणसे सरदारकी-जहागिरी आणखी मोठ्या हुद्यासाठी परक्या सत्ता धीश्यांच्या चाकरीत धन्यता मानून शिवाजी राज्याच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करत आहेत.

औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुसलमानपंथीय व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा हता.

पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला यमसदनी पाठविल्या नंतर तो जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही.

औरंगजेबाने शिवाजीरायांना पकडून आग्रा येथे ठेवले. पण तेथुही ते शिताफीने निसटले. तेव्हा औरंगजेबाने धसकाच घेतला.

शिवाजीला लढाईचे राज्य कारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले.दहा-बारा वर्षाचा असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले.

माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा.

माझ्या बांधवांना गुलामीतून व छळातून मुक्त करायचेच! हाच उद्देश ठेवून त्यांनी सह्यांन्द्रिच्या कडेकपारीत भटकून सवंगडी ग्ला केले.

तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले. श्री रोहिडेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. आणि एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यानपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला.

साम-दंड-भेद यांचा उपयोग करत वयाच्या स्लाव्या वर्षी शिवाजींनी ‘तोरणागड’जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.

एका मागून एक गड आणि किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त केला. राक्षसी देहाचा अफझलखान भेटीचे ढोंग करून शिवाजीचा घात करायला आला होता.

प्रतापगडावर भेट ठरली. मिठी मारण्याचे सोंग करून त्याने शिवाजीवर तलवार चालवली.

पण शिवाजी सावध होताच.

हातात लपवलेल्या वाघनखांनी अफझलखानचा कोथडाच काढला. पळून गेला म्हणून शाहिस्तेखान वाचला. शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या प्रत्तेक संकटांला धीराने सामोरे गेलेच.

पण त्यांचे सवंगडीही त्यांना समर्थ साथ देत होते. सिंहगड घेतांना तानाजी पडला .

खिंड लढवितांना बाजीप्रभुणे छातीचा कोट केला . मुरारबाजी महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यानी आपल रक्त दिले.

आपले प्राण दिले . स्वराज्य अकराला आले. स्वराज्यात आता चोऱ्याऐंशी किल्ले आणि दोनशे चाळीस गड होते . लोकांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याचा आग्रह केला.

महाराजांनी आपल्या मातेशी आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करून राज्यभिषेक करवून घ्यायचा असे ठरवले. काशीचे प्रसिद्ध पंडित गागाभट्ट धार्मिक विधी करण्यासाठी आले.

स्वराज्याची राजधानी रायगड ठरली.

हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनाव्रर बसला.

लोकांनी जयजयकार केला.

“क्षत्रिय कुलावतंस गोब्राम्हण प्रतिपालक हिंदू पतपातशहा छत्रपती श्री शिवजी महाराज की जय ” शिवाजी महाराजांनी आपले जीवन देश, देश आणि धर्म यासाठी वेचले.

संत तुकाराम हे त्याचे अध्यात्मिक गुरु होते. तर संत रामदास हे त्याचे राजकीय गुरु होते. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक ६ जून, १६७४ साली रायगडावर साला.

त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे ६ वर्षानंतर ३ एप्रिल, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले. रामदासांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले.

“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।। अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

शिवाजी महाराज का दूसरा कड़क भाषण

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेस साजरी होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की, साडेतीनशे वर्षे झाली तरीही त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे.

आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत सतीचे वाण आपल्या हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो.

शिवाजी महाराज त्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता आणि त्या मध्ययुगीन राजवटीमध्ये सुलतानांच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची.

डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करून जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफेच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत.

अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजता होती, पण शिवाजी महाराजांनी अशाही स्थितीत परकियांची राजवट उलथून टाकून स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा पण केला.

हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते.

एकदा असे साहस करण्याचा निर्धार केल्यावर कितीही संकटे आली तरीही आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याचा त्यांचा गुणही असामान्यच होता.

राजेच निश्चयापासून ढळले असते तर सारे सहकारीही बिथरले असते. म्हणून खंबीरपणे उभे राहून महाराजांनी केवळ अडचणींना तोंडच दिले असे नाही तर त्या अडचणींतून मोठ्या कुशलतेने मार्गही काढला.

महाराजांनी आपल्या सवंगड्यात स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद इतका पक्का रुजवला होता की, त्या ध्येयवादाच्या मार्गातून त्यांचे सहकारी कधीही ढळले नाहीत.

शिवाजी महाराजांचे काही आप्तच त्यांचा विरोधात होते. अशावेळी त्यांना निष्ठा वाहिलेल्या कोणीही, महाराजांचे आप्तच स्वराज्याच्या विरोधात आहेत मग आपणच स्वराज्यापायी आपल्या संसाराची वाताहत कशाला करून घ्यायची असा विपरीत विचार केला नाही.

त्यांनी आपली निष्ठा महाराजांना वाहिली.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हाच केवळ त्यंचा मोठेपणा आहे असे नाही, तर त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि अक्षरश: मूठभर सहकाऱ्यांच्या मदतीने ते इतिहासदत्त कार्य केले.

असे करण्यासाठी लागणारी धीरोदत्त वृत्ती, संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते म्हणूनच हे शक्य झाले.

त्यांच्या अंगी असलेल्या या गुणांचा अभ्यास, विश्लेषण आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे.

मध्ययुगामध्ये अनेक राजे, महाराजे आणि सुलतान होऊन गेले. त्या प्रत्येकाशी तुलना केली तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराने फारसे मोठे नव्हते.

परंतु त्यांच्या समकालीन असलेल्या कोणत्याही सुलतानापेक्षा किंवा शहापेक्षा शिवाजी महाराजांचे पोवाडे जास्त गायिले जातात. त्याचे सर्वात मोठे कारण होते शिवाजी महाराजांची प्रजाहितदक्षता.

आपल्या राज्यामध्ये प्रजेला कसलाही त्रास होता कामा नये याबाबत महाराज कमालीचे दक्ष होते.

त्यामुळे त्यावेळच्या प्रजेला स्वराज्य आपले आहे असे वाटत असे. अन्य राजवटीच्या बाबतीत असे घडलेले नव्हते. हे

महाराजांचे वैशिष्ट होते. त्याकळेचे जहागीरदार, वतनदार प्रजेला पिळून स्वत: ऐटित राहत असत आणि सामान्य माणांसावर अनेक प्रकारचे अत्याचार करत असत.

परंतु प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारे शिवाजी महाराज हे त्या काळात एक आगळेवेगळे राजे म्हणून जाणले जात. प्रजेला सवलती देणारा राजा ही संकल्पनाच त्या मध्ययुगामध्ये क्रांतीकारक ठरलेली होती.

म्हणूनच शिवाजी महाराजांविषयी असे म्हटले जाते की, राजे तर अनेक होऊन गेले, पण त्यातल्या कोणत्याही राजाला प्रजेने देवाचा अवतार मानलेले नव्हते. शिवाजी महाराजांना मात्र जनतेने देवाचा अवतार मानलेले होते.

शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने रयतेच्या या कल्याणकारी राजांना कोटी कोटी वंदन करून माझ्या प्रस्ताविकास मी येथे पूर्णविराम देतो…..

लेखक
भाषा हिन्दी
कुल पृष्ठ 3
PDF साइज़1 MB
CategoryEducation
Source/Creditspdffile.co.in

छत्रपति शिवाजी महाराज जयंती भाषण दूसरी PDF

Relatead PDFs

The History of Shivaji: The Grand Rebel PDF

शिवाजी महाराज इतिहास मराठी PDF

छत्रपति शिवाजी महाराज जयंती भाषण – Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Speech Marathi PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!