समाज स्वास्थ्य मासिक | Samaj Swasthya PDF In Marathi

समाज स्वास्थ्य – Samaj Swasthya Book PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

धुपणी विवाहित व अविवाहित स्त्रियांच्या किंवा मुलीच्याहि योनिमार्गा तून कधीकधी पांढरा द्रव बाहेर येत असतो. या रोगास धुपणी म्हणतात. हा प्रवाह दुधासारखा स्वच्छ पांढरा असल्यास त्यापासून फारसा धोका नाही,

परंतु तो पिवळसर किंवा हिरवा असल्यास मात्र ताबडतोब उपाय केला पाहिजे. याचा संबंध कधी एकंदर प्रकृतीशी असतो व कधी जननेंद्रियाच्या अस्वच्छतेशी असतो.

शरि रास जेथें जेथें छिद्र असते तेथें रोग जंतु शिरण्यास वाव मिळतो, म्हणून अशी सर्व छिद्रे स्वच्छ ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु नाक, कान, डोळे यांप्रमाणेच गुदद्वार व जननेंद्रिय स्वच्छ ठेवावें हे पुष्कळांस माहीत नसते.

ज्यांस धुपणीचा विकार आहे त्यांनी औषधी उपायांबरोबरच खालाल सामान्य नियम पाळावे. १. शौचाचे वेळी योनिद्वार देखील साबणोन स्वच्छ धुवावें. २. शक्य तितका वेळ मोकळ्या हवेत काढावा व पुरेसा व्यायाम करावा.

३ जनने- द्रियाचे आसपास हवेचा संचार होईल असे कपडे घालावे. या दृष्टीनें कासोटा घालण्याची पद्धत वाईट आहे. ४. फार वेळ बसून रहावें लागेल अशी कामें हातां होईल तो करूं नये.

५ अन्न शक्तिवर्धक असावे व नीट चाबून खावें. ६. दांत तपासून घेऊन उत्तम स्थितीत ठेवावे. आपणास बहुतेक सर्व कारमें हातांनी करायची असतात व हातांचा आणि बोटांचा प्रत्येक ठिकाणी संबंध येतो.

स्पर्शज्ञानं सर्व त्वचेनें होतें खरें, परंतु बोटां- इतके सूक्ष्म रीतीने होत नाहीं. उदाहरणार्थ कापडाचे सूत किती तलम आहे हैं बोटांसच उत्तम समजेल. परंतु हे समजण्यास बोटांची त्वचा खडबडीत असतां कामा नैय.

शिवाय अस्वच्छ त्वचेवर रोगजंतूंची राहण्याची सोय चांगली होते यामुळे तेथें ते पुष्कळ असतात व सुई वगैरे टोचल्यास ते रक्तांत शिरतात किया जेवतांना पोटांत जातात व अनेक रोग उत्पन्न करतात,

यावरून स्वच्छ हातांचे महत्त्व लक्षात येईल. शिवाय स्वच्छ हात हा सौदर्याचा एक भाग आहे हे ख्रियांस तरी सांगण्याचें कारण पडूं नये.

प्रत्येक जेवणाचे अगोदर व इतर केव्हांही हात खराब झाल्यास ते धुतले पाहिजेत. हातांस माती लावून धुतल्याने ते स्वच्छ होतात ही प्राचीन समजूत सूक्ष्मदर्शक यंत्राने खोटी ठरवली आहे. मातीने सूक्ष्मजंतु मरत नाहीत व म्हणून हात स्वच्छ होत नाहीत.

लेखक र. धों. कर्वे – Raghunath Dhondo Karve
भाषामराठी
एकूण पृष्ठे 276
Pdf साइज़19.6 MB
Categoryसाहित्य(Literature)

भारतीय समाज PDF

समाज स्वास्थ्य मासिक – Samaj Swasthya Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!