मराठी लघुलेखन मार्गदर्शिका – Marathi Laghulekhan Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
अभ्यास २९: लघुलिपीत लिहा
वास्तविक ही वस्तुस्थिती राम अनेक दिवसांपासून जाणतो. परंतु या ठिकाणी काही विशिष्ट लोकांच्या स्तुतीचे स्तोम जास्त आहे हे स्पष्ट दिसते. याशिवाय अशी वस्तुस्थिती दिसली नसती.
वस्तुतः या विशिष्ट दिवशी असे होऊ नये. विशेषतः अध्यक्षांची तशीच इच्छा असावी असे मी समजतो. शेवटी शिक्षण हीच महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा शिक्षणाविषयी आस्था असावी हे स्पष्ट आहे.
कारण शिक्षण हेच सर्व उन्नतीचे अधिष्ठान आहे. ही कटु स्पष्टोक्ती असेल, पण ती या ठिकाणी आवश्यक होती. शिक्षणाशी एकनिष्ठ राहणे किंवा शिक्षणाविषयी निष्ठा ठेवणे हे आवश्यक आहे. यापेक्षा याविषयी या स्थळी जास्त स्पष्ट बोलणे आवश्यक नाही.
‘र’ आणि ‘ल’ व्यंजनाकरिता अंकुशांचा उपयोग
एखाद्या व्यंजनानंतर त्याला जोडून ‘र’ हे व्यंजन आले तर त्या ‘र’ करिता त्या व्यंजनाच्या संकेतरेखेला सुरवातीस एक लहानसा अंकुश द्यावा. या अंकुशाला ‘र’ चा अंकुश असे म्हणतात.
सरळ संकेतरेखांना हा अंकुश उजव्या दिशेने द्यावा. म्हणजेच अधोगामी सरळ संकेतरेखेला तिच्या डाव्या बाजूला व अग्रगामी संकेतरेखेला तिच्या खालच्या बाजूस द्यावा.
कोराकृती संकेतरेखेच्या बाबतीत हा अंकुश कोराकृतीच्या आतमध्ये द्यावा. उदाहरणार्थ, ऊर्ध्वगामी संकेतरेखांना हा अंकुश लागत नाही. तसेच, ‘स’ आणि अधोगामी ‘र’ आणि अधोगामी ‘ह’ यांच्या संकेतरेखांनाही हा अंकुश लागत नाही.
एखाद्या व्यंजनानंतर त्याला जोडून ‘ल’ किंवा ‘ळ’ हे व्यंजन आले तर त्या ‘ल’ किंवा ‘क’ करिता त्या व्यंजनाच्या संकेतरेखेला सुरवातीस एक लहानासा अंकुश द्यावा. या अंकुशाला ‘ल’ चा अंकुश असे म्हणतात.
सरळ संकेतरेखांना हा अंकुश डाव्या दिशेने द्यावा. म्हणजेच अधोगामी सरळ संकेतरेखेला तिच्या उजव्या बाजूला आणि अग्रगामी सरळ संकेतरेखेला तिच्या वरच्या बाजूस द्यावा.
कोराकृती संकेतरेखेच्या बाबतीत ‘र’ चा अंकुश दुप्पट मोठा करून लिहिला म्हणजे ‘ल’ किंवा ‘ळ’ चा अंकुश होतो. उदहारणार्थ,
ऊर्ध्वगामी संकेतरेखेला ‘ल’ चा अंकुश लागत नाही. त्याचप्रमाणे ‘स’ आणि अधोगामी ‘ह’ यांच्या संकेतरेखांनाही हा अंकुश लागत नाही.
कोणतीही संकेताकृती जास्तीत जास्त संक्षिप्त स्वरूपात आणि सहज लिहिता यावी म्हणून एखादे व्यंजन व त्यानंतर येणारा ‘र’ किंवा ‘ल’ – ‘ळ’.
लेखक | वी वी इनामदार-V. V. Inamdar |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 331 |
Pdf साइज़ | 22.1 MB |
Category | साहित्य(Literature) |
मराठी लघुलेखन मार्गदर्शिका – Marathi Laghulekhan (Shorthand Steno) Book/Pustak Pdf Free Download
Marathi shorthand books please send old edition and answer key
मराठी शॉर्टहॅन्ड पुस्तकाची answer key मिळाली का
मराठी लघुलेखन पुस्तक पाहिजे
सर नवीन शोर्तःन्द पुस्तक आहे का नवीन
आयेगी तो आपको भेज देंगे