महाभारत सभा पर्व | Mahabharata Sabha Parva PDF In Marathi

महाभारत सभा पर्व – Mahabharata Sabha Parva Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

वैशंपायन-हे भारता, भगदत्ताचे हैं वचन ऐकून ‘हे उदार राजा, तूं आम्हांला खंडणी देणार आहेस एवढ्यानेच आमचे प्रिय कार्य झालें’ असें अर्जुन बोलला व याप्रमाणे भगदत्ताला अंकित करून घेऊन कुबेराने रक्षण केलेल्या उत्तर दिशेकडे तो वळला.

तेथे त्याने अंतर्गिरि, बहिर्गिरि व उपगिरि हे पर्वत जिंकून घेतले व त्या प्रदेशांतील सर्व नृपतींना वश करून त्यांच्यापासून धन मिळविले. नंतर त्या सर्व भूपालांसह तो उलुक देशांतील ‘बृहन्त’-राजा वर चालून गेला.

तो राजा मृदंगार्या नादानें र्थचक्राच्या ध्वनी व मत्तगजांच्या ची स्काराने सर्व पृथ्वीला कांपवीत असे, तो बस्प राजा पार्थ आपल्या देशावर चाल करून आला आहे, असें पहातांच आपल्या चतुरंग सैन्यासह घरातून बाहेर पडला.

धनंजयाशीं त्याचें भयंकर युद्ध झाले. पण हे राजा, त्या तुमुल रणसंग्रामांत पार्थाच्या अतुल पराक्रमापुढे वृहत टिकाय धरूं शकला नाहीं. तो अजिंक्य पर्वतेश्वर बृहन्त आपल्या रत्नभांडारासह सर्व प्रकार पार्थाच्या स्वाधीन झाला.

तेव्हा अर्जुनाने त्यांचे राज्य त्याला परत देऊन त्याच्यासह सेनाबिंदूवर स्वारी केली व त्या राजाला सत्वर पदच्युत केले.

त्यानंतर फाल्गुनाने प्रजेने व्यापार असलेले मोदापूर, कामदेव, सुदामा व उत्तर उलूक या देशांच्या नृपांना एकत्र करून त्यांना धर्मराजाचे सार्वभौमत्व मान्य करावयास लावले. पुढे पार्थानं पंचगण देश जिंकला.

तेथून तो सर्व भूपालांसह सेनाबिंदुराजाच्या देवप्रस्थनगरीस गेला व तेथे आपल्या चतुरंग वैशंपायन-हे राजा, ठीक आहे; वस्तुतः त्या चारी पांडुपुत्र यांनी सर्व पृथ्वी जरी एकाच वेळी जिंकले तरी मी तुला अगोदर धनंजयाचा विजयवृत्तान्त कथन करितों.

हे भरतर्पभा, स्या पराक्रमी धनंजयानें प्रथम कुलिंद देशांतील सर्व नृपतींना विशेष पराक्रमावांचूनच सहज वश करून घेतले.

नंतर त्यानें आनर्तत व कालकूट हे देश जिंकून सैन्यासह सुमंडल-राजाचा पराभव केला आणि त्या सुमंडलासह, सव्यसाची शाकलद्वीप व प्रतिविंध्य-राजा यांवर चाल करून गेला.

तेव्हां शाकलद्वीप व सप्तद्वीप यांतील सर्व भूपालांशी अर्जुनाच्या सैन्याचें तुमुल युद्ध झाले. परंतु हे भारता, त्या महान् धनुर्धारी भूपतींनाहि पार्थानं जिंकिलें व या जिंकलेल्या सर्व नृपालांसह त्याने प्राग्न्योतिष देशावर चाल केली.

लेखक Unknown
भाषामराठी
एकूण पृष्ठे 248
PDF साइज़23.2 MB
CategoryReligious

महाभारत सभा पर्व – Mahabharata Sabha Parva Book/Pustak PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *