सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टि | Sarth Amrutanubhav Marathi PDF

सार्थ अमृतानुभव – Sarth Amrutanubhav Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

या प्रकरणाच्या सुरुवातीस श्रीज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना वंदन करतांना म्हणतात- श्रीमान् महायोगी श्रीनिवृत्तिनाथ हे ( माझे सद् गुरु ) दैवत निर्विकार आणि आनंदरूप आहे. त्याला उत्पत्ति नाही, त्याला नाशहि नाहीं.

त्या दैवतांचें वर्णन करतां येत नाही. त्या दैवताचा मी आश्रय घेतों. १. या जगांत सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ आणि आनंद देणाऱ्या ज्ञानरूप ब्रह्मविद्येचा जयजयकार असो. दयाळू विद्यामाउलीला मी वंदन करतों.

२. शिवशक्तीच्या रूपांत द्वैताचा एकसारखेपणामुळे आभास होतो. ह्या दोहोंपैकी कोणाच्या आश्रयानें दुसरे कोण आहे हें समजणें, तसेंच यांतील सार्ध कोण हें कळणेंहि दुरुपास्त आहे.

३. ब्रह्म या आपल्या मूळ स्वरूपाच्या बाबतीत शिव आणि शक्ति दोघेहि अभिन्नता दाखवितात. हीं दोन्हीं जगतांचें मूळ कारण आहेत. या दोघांच्या मूळ स्वरूपाचा म्हणजेच ब्रह्मस्वरूपाचा लाभ व्हावा यासाठी मी शिवशक्तीला नमन करतों.

४. विश्वाच्या आरंभाला, अस्तित्वाला आणि विलयाला श्रीशंभु हाच कारण आहे. निमित्तोपादनहिं तोच आहे म्हणून आदि-मध्य-अंत अभिन्नत्वानें तोंच आहे. पण ही सारी त्याच्या ठिकाणी नाहीतच. आपल्या रूपानें परिपूर्ण असणाऱ्या परमात्म्याला मी वंदन करतों.

९६. व्रीचें काम जर पाणी करू शकेल, ताए हैं एस्प ज्ञानापासून विस्तारलेले आहे असे खुशी मानावें ९७. सर्व काळांनी नटलेला पौर्णिमेचा चंद्र जर दर्शन घडवील तर हे ज्ञान, अज्ञान, या नावाला पात्र होईल.

९८. विपानें अल्यन्त प्रेमाने पान्हा सोडला तर ते काय अमृत देईल ! विपाने पान्हा सोडला तरी विषय दुभणार.

९९, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी या सर्व ज्ञानाचा व्यवडार प्रत्यक्ष ओतप्रोत भरलेला दिसतो, ल्या ठिकाणी अज्ञानाचा पूर आाला आहे असे म्हणे कसें शोसेल :

१००. ज्ञानाच्या सर्व व्यवहाराला अज्ञान म्हणतो तर ज्ञानाचे स्वरूप काय! वास्तविक सर्व ज्ञानरूप आत्माच आहे.

१०१.ज्या आत्म्याला काहीच होणे नाही, त्या आत्प्याला मी आहें ” इदमित्यम’ म्हणजे आत्मा असा किया बात्मा शून्य आहे असा कोणताहि निर्णय करिता येत नाही अशी प्रमाणांनी शपथच घेतली.

१०२. ‘आहे’ असे म्हणण्यासारखी आत्म्याला स्वरूप- स्थिति नाही, मग ‘नाही हैं म्हणायाचे प्रयोजन नाही. सारांश, ‘आहे. नाही’ अशा दोही धर्मानी शून्य आत्मा आहेपणानेच आहे.

१०३. ताअडकाऊ माळी । पदाधु हा ॥ कोणाच्या होण्यावाचून आत्मा आपल्या स्वरूपाने आहेच. कांही न पाहता, तो पाहणेपणानेच आहे. असा स्वयंसिद्ध आत्मा ‘नाही असें कसे म्हणता येईल ?

१०४. आत्मा हा नाहीपणाचा आळसुद्धा मुकाठनें सजन करितो, व तसेच कोणी सच्चिदानंद विशेष भाषा ला आणणे असतां स्वस्थ असतो.

लेखक चांगदेव पासष्टि- Changdev Pasashti
भाषामराठी
एकूण पृष्ठे 138
Pdf साइज़4 MB
Categoryधार्मिक(Religious)

सार्थ अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टि – Sarth Amrutanubhav Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *