संतोषी मातेची आरती | Santoshi Mata Aarti PDF In Marathi

‘संतोषी मातेची आरती’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Santoshi Mata Aarti’ using the download button.

संतोषी मातेची आरती व भक्तिगीत – Santoshi Mata Aarti Aur Bhaktigeet PDF Free Download

Santoshi Mata Aarti Marathi Lyrics

जय देवी श्री देवी संतोषी माते।
वंदन भावे माझे तव पदकमलाते।।धृ।।
श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी।
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी।।
जननी विश्वाची तू जीवन चिच्छक्ती।
शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती।।१।।

गुरूवारी श्रध्देने उपास तव करिती।
आंबट कोणी काही अन्न न सेवीती।।
गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती।
मंगल व्हावे म्हणूनी कथा श्रवण करिती।।२।।

जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती।
अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थती।।
त्याच्या हाकेला तू धावूनिया येसी ।
संतती वैभव कीर्ती धनदौलत देसी।।३।।

विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे।
भवभय हरूनी आम्हा सदैव रक्षावे।।
मनीची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी।
म्हणूनी मिलिंद माधव आरती ओवाळी।।४।।

संतोषी मातेची भक्तिगीते

(१) माझी आई संतोषी माई……….

माझी आई संतोषी माई तिच्या विणा कोणी नाही ।। धृ. ।।

दुःख दारिद्र्याचे जीवन जगणे फार कठीण जीवन

त्राहि त्राहि त्राहि माझी आई संतोषी माई तिच्या विणा कोणी नाही ॥ १ ॥

करिता मातेची आठवण जीवन जाईल तुमचे बदलून दुःख दारिद्र्याचा नाश होई

माझी आई संतोषी माई तिच्या विणा कोणी नाही ॥ २ ॥

व्रत करावे मातेचे सोळा शुक्रवाराचे त्याने इच्छित फल प्राप्त होई

माझी आई संतोषी माई तिच्या विणा कोणी नाही ॥ ३॥

जीवनात आहे मान माता तुझ्या कृपेन माझे मस्तक तुजया पायी

माझी आई संतोषी माई तिच्या विणा कोणी नाही ॥४॥

मातेचे नाम ठेवा मुखी जीवन होईल तुमचे सुखी माता तुमच्या पाठीशी राही

माझी आई संतोषी माई तिच्या विणा कोणी नाही ॥ ५॥

एक भक्त करतो विनंती मातेची करा तुम्ही भक्ति ती होईल

तुमची शक्ति मातेची करा तुम्ही भक्ति मोक्षाचा दुसरा मार्ग नाही माझी आई संतोषी माई तिच्या विणा कोणी नाही ॥ ६॥

AuthorKishan Ravsaheb Bhosle
Language Marathi
No. of Pages8
PDF Size2.4 MB
CategoryReligious

Santoshi Mata Aarti In Marathi MP3 Download Here

Related PDFs

शिव आरती PDF

संतोषी मातेची आरती व भक्तिगीते – Santoshi Mata Aarti Aur Bhaktigeete PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!