शिरडीच्या साईबाबांचे व्रत कथा | Sai Baba Vrat Katha In Marathi PDF

साईबाबांचे व्रत कथा – Sai Baba Vrat Katha Book PDF Free Download

व्रतमाहात्म्य

नऊ गुरुवारचे शिरडीच्या साईबाबांचे व्रत

हे श्रीसाईबाबांप्रीत्यर्थ केले जाणारे एक महाफलदायी श्रेष्ठ व्रत आहे. मनुष्याला नित्याच्या जीवनात अनेक संकटांना, अडचणींना व पेचप्रसंगांना सामोरे जावे लागते.

त्यामुळे मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य, चिंता, क्लेश, उद्वेगे अशा अनेक गोष्टी उद्भवतात. मनःशांती हरपते. या व्रताचरणाने श्रीसाईबाबांची प्रसन्नता लाभून त्या सर्वांचे निवारण होते.

यश, कीर्ती, सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य व आयुरारोग्य लाभते. कटू प्रसंगांना तोंड देण्याचे सामर्थ्य (धैर्य) प्राप्त होते. श्रद्धा वृद्धींगत होते. साईभक्तीची हीच किमया आहे.

शत्रुभय नाहीसे व्हावे, विद्याभ्यासात प्रगती व्हावी, नोकरी मिळावी, लग्न व्हावे, धंदा व्यवसायात गती मिळावी, संकटाचे निवारण व्हावे, सर्व प्रकारची समृद्धी यावी, प्रगती व्हावी, उत्तम संतती लाभावी अशा अनेक इष्टकार्यसिद्धींसाठी हे व्रत केले जाते.

संकटसमयी श्रीसाईबाबांना आर्त हाक मारून या व्रताचा संकल्प केल्यावर त्या संकटातून सुखरुप सुटका झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मात्र संकल्प केल्याप्रमाणे या व्रताचे आचरणही केले पाहिजे, या व्रताचे अनेकांना चमत्कारिक अनुभव आलेले आहेत. या व्रताचरणाने आपलेही कल्याण होईल अशी निष्ठा ठेवा.

श्री साईबाबांची पंचोपचार पूजा

पूजेची पूर्व तयारी –

१) पूजास्थान स्वच्छ करून घ्यावे.

२) जेथे पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्याजागी रांगोळीने स्वस्तिक काढावे. मग पाट (चौरंग) मांडून त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी.

३) पाटावर (चौरंगावर) कोरे पिवळे वस्त्र घालावे.

४) त्यावर श्रीसाईबाबांची तसबीर ठेवावी, तसबिरीतील साईबाबा बसलेले असावेत. ही तसबीर पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

५) चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा कुंकुमाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनासाठी सुपारी ठेवावी. डाव्या बाजूस घंटा ठेवावी.

६) चौरंगावर श्रीसाईबाबांच्या तसबिरीसमोर उदबत्ती, निरांजन, पानसुपारी, प्रसादाचा नैवेद्य ठेवण्यास पुरेशी जागा असावी.

(७) पूजेचे साहित्य तबकात आपल्या उजव्या हातास ठेवावे.

८) समई प्रदीप्त करून चौरंगाच्या शेजारी आपल्या डाव्या बाजूस ठेवावी.

९) स्वतःला बसण्यासाठी आसन मांडावे.

Author
Language Marathi
No. of Pages9
PDF Size1.4 MB
CategoryVrat Katha

और पढ़े:

Sai Baba Vrat Katha PDF In Hindi

Sai Baba Vrat Katha PDF In English

साईबाबांचे व्रत – Sai Baba Vrat Katha Book PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *