नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना | Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana PDF In Marathi

‘Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना’ using the download button.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana Marathi Book PDF Free Download

nanaji-deshmukh-krishi-sanjivani-yojana

Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana Form

प्रस्तावना: विदर्भ व मराठवाडयातील सुमारे ४००० दुष्काळग्रस्त गावांमध्ये तसेच विदर्भातील पुर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्टयातील सुमारे ९०० गावांमध्ये आगामी ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने रु. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पूर्वीचे नांव हवामान अनुकूल कृषि विकास प्रकल्प राबविण्यास दि. ७.७.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूरी प्रदान केलेली आहे.

या प्रकल्पाची जिल्हा स्तर, उप विभाग स्तर व गाव समूह स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार असून प्रकल्पांतर्गत मराठवाडा, विदर्भ व नाशिक विभागातील मिळून एकूण १५ जिल्हयांचा समावेश आहे (औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, जळगाव).

प्रकल्पांतर्गत या १५ जिल्ह्यातील हवामान बदलास अतिसंवेदनक्षम ठरणारी ४२१० गावे व पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाण पट्टयातील भूजल क्षारतेची समस्या असलेली ९३२ गावे, अशा एकूण ५१४२ गावांची निवड करण्यात आलेली आहे…

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर हाती घ्यावयाच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करून प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ (४९) अन्वये प्रकल्प समिती स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे.

त्यानुषंगाने, प्रकल्पांतर्गत समाविष्ट गावच्या प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ग्राम कृषि संजीवनी समिती (Village Climate Raellence Agriculture Management Committee (VCRMC)}” स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. :-

शासन निर्णया १. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या ५१४२ गावांसाठी संबंधीत गावांच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ (४९) अन्वये ग्रामसभेव्दारे ग्राम कृषि संजीवनी समिती (Village Cimate Resilience Agriculture Management Committee (VCRMC)) स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

प्रकल्पांतर्गत निवडलेल्या ५१४२ गावांसाठी ग्राम कृषि संजीवनी समिती संबंधीत गावांच्या ग्रामपंचायतीची विकास समिती म्हणून कार्यरत राहील.

१२. गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम विनियोग करण्याच्यादृष्टीने गाव पातळीवर सुक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठी तसेच, प्रकल्पांतर्गत हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याकामी कृषि विभागास सहाय्य करण्याकरिता गावातील कृषि व ग्राम विकास क्षेत्राशी संबंधित असलेल्या १३ व्यक्तींचा ग्राम कृषि संजीवनी समितीमध्ये (VCRMC) कार्यकारी सदस्य म्हणून समावेश असेल.

टिप :- १. प्राधान्याने महाराष्ट्र शासन / जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी विद्यापीठ / कृषी विज्ञान केंद्रामार्फत गौरवलेले शेतकरी अन्यथा कृषी विज्ञान मंचाचे सदस्य, इ. पैकी सध्या शेती कसत असलेले गावातील शेतकरी

२. गावातील शेतकरी उत्पादक कंपनी वा गट तसेच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गट प्रतिनिधीचे संबंधित कंपनी / गटाकडून नामनिर्देशन प्राप्त करून घ्यावे.

३. शेती बरोबरच बिजोत्पादन, अन्नधान्य / फळे भाजीपाला प्रक्रिया, सेंद्रिय खत निर्मिती, कृषी पर्यटन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, रोपवाटिका, इ. पैकी कोणताही कृषि पूरक व्यवसाय करणारा/री शेतकरी.

४. पदसिद्ध तांत्रिक सदस्य व समिती सचिवास मतदानाचा अधिकार असणार नाही.

१. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातंर्गत संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक

६. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत संबंधित गाव समुहाकरिता नियुक्त समूह सहाय्यक

७. कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत निवडलेले कृषि मित्र

८. अकार्यकारी सदस्यांनी समितीमध्ये चर्चेत सहभागी होऊन तांत्रिक सल्ला द्याया वा आपले मत नोंदवावे तथापि, एखाद्या प्रकरणी निर्णय घेतेवेळी समितीने मतदान घेतल्यास अकार्यकारी सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही

३. ग्राम कृषि संजीवनी समितीची स्थापना व १३ सदस्यांची निवड संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेद्वारे करावी. ज्या गावांमध्ये ग्रुप ग्रामपंचायत असेल तेथे ग्राम कृषि संजीवनी समितीतील सरपंच व उप सरपंच पदावरील व्यक्ती वगळता अन्य कार्यकारी व अकार्यकारी सदस्य म्हणून ज्या गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे त्याच गावातील सदस्यांचा समावेश करावा.

४. ग्राम कृषि संजीवनी समिती मधील एकूण १३ कार्यकारी सदस्यांपैकी किमान ९ सदस्य अल्प भूधारक (१ ते २ हे. पर्यंत जमीन धारणा) अथवा अत्यल्प भूधारक (१ हे. पर्यंत जमीनधारणा) असावेत. तसेच परिच्छेद क्र. २ मधील तक्त्यात नमूद केल्यानुसार १३ कार्यकारी सदस्यांमध्ये विविध प्रवर्गातील सदस्यांचा समावेश असावा.

(सर्वसाधारण, अनुसूचित जाती व जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, पुरुष व महिला

५. त्याचप्रमाणे, परिच्छेद क्र. २, ३ व ४ मधील निकषानुसार निवडण्यात येणाऱ्या १३ कार्यकारी सदस्यापैकी किमान ७ सदस्य महिला असणे बंधनकारक राहील सबब, सरपंच व उप सरपंच पदावरील व्यक्तीं पुरुष वा महिला प्रवर्गातील असल्याचे लक्षात घ्यावे व उर्वरीत ११ सदस्यांच्या पदावर आवश्यक संख्येत महिला प्रवर्गातील व्यक्तींची निवड करावी.

६. सदर समितीचे सदस्य सचिव हे संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी / असल्याने त्यांनी या समितीच्या बैठकाचे आयोजन करणे व दस्तऐवज इत्यादिची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरात ठेवणे आवश्यक असेल.

७. तसेच या समितीचे सह सचिव हे समूह सह्यायक असल्याने ते समितीच्या बैठकीकरीता आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे, विविध माहिती व विवरणपत्रे तयार करून बैठकीत सादर करतील. तसेच

Author
Language Marathi
No. of Pages32
PDF Size3.5 MB
CategoryForm
Source/Creditsmahapocra.gov.in

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना – Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana Marathi Book PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!