मराठी कादंबरी – Marathi Kadambari Book/Pustak PDF Free Download
कादंबरी चा उगम
कादंबरी हा साहित्यप्रकार जरी आधुनिक असला तरी त्याचें बीज फार पुरातन आहे. गोष्टीवेल्हाळपणा हा मानवाचा एक म्वाभाविक विशेष आहे. भारतीय मानवांतहि तो तितक्याच प्रामुख्याने दिसून येतो.
आश्चर्यकारक निसर्गविषयक अनुभव आले ते त्याने वेदांतील कथांमध्ये, व त्याला जे अद्भुत कथांमध्ये ग्रथित केले. आपले जीवनविषयक आदर्श त्याने रामायण महाभारत यांसारख्या महाकाव्यांत चित्रित केले.
अद्भुताचे आकर्षण व आदर्शाचे चित्रण हे या प्रारंभीच्या कथावाङ्मयाचे मुख्य विशेष आहेत. केवळ करमणुकीसाठी म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्यांतहि या दोन प्रवाहांचें, अद्भुताचें व आदर्शाचें, मिश्रण दिसून येतें.
गुणाढ्याची ‘बृहत्कथामंजरी’ वा सोमदेवाचा ‘बृहत्कथासरित्सागर’ यासारख्या ग्रंथामध्ये हें मिश्रण स्पष्टपणे दिसून येतें.
रामायणांतील राम, लक्ष्मण, सीता यांच्या चरित्रांच्या नमुन्यावर व परस्परसंबंधाच्या कल्पनेवर गुणाढ्याने आपल्या नरवाहनदत्त, गोमुख, मदनमंचुका इत्यादींची कथा रचिली.
व तिच्या उठावासाठी केवळ लोककल्पनेंतून उद्भवलेल्या अशा विद्याधरांच्या अद्भुत उपकथांची तिला जोड दिली.
लहान मुलांसाठी रचिलेल्या, आजीबाईच्या मुखाबाटे परंपरागत चालत आलेल्या नवलकथा, यक्षकिन्नरांच्या गांधर्वकथा, गांवच्या वेशीवरच्या भुता-राक्षसांच्या लोकाचारविषयक ज्ञानाच्या कहाण्या,
व्यवहारचातुर्याची दीक्षा देणाऱ्या नीतिकथा, अशा कितीतरी कथाप्रकारामध्ये हे दोन्ही प्रवाह एकत्रित झालेले दिसून येतात.
अशा कथांचे फार थोडे अवशेष आज उपलब्ध आहेत; काळाच्या प्रवाहांत व बदलत्या जीवनाच्या ओघांत कितीतरी वाहून गेले. परंतु जे कांही आढळतात त्यावरून एवढें अनुमान मात्र निश्चितपणे काढतां येतें कीं अशा कथांचा विस्तार सगळीकडे पसरला होता.
प्रत्येक लोकभाषेंत त्यांचीं रूपांतरें अवतरलीं होतीं, व त्यांचा लोकजीवनाश निकटचा संबंध होता. ” भारतीय लोककथा एका लोक समूहापासून दुसऱ्या
लोकसमूहाकडे इतक्या लवकर भटकत गेल्या क आपणाला युरोप आणि आशिया खंडांतील बहुतेक सर्व प्रदेशांतून, इतकेच नव्हे तर आफ्रिकन लोकांतहि त्या अंशरूपानें दिसतात. ”
मराठीतील आद्य कथावाङ्मय महाराष्ट्रापुरतें बोलायचे झाले तर बाराव्या शतकांत मराठींत गद्य व पद्य या दोन्ही प्रकारांत कथावाङ्मय निर्माण होऊं लागलें होतें.
लहान मुलांसाठी नीतिकथा लिहिल्या जात होत्या. महानुभाव पंथांचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांच्या आख्यायिका भक्तिभावाने ग्रथित केल्या जात होत्या.
त्यांच्याच पंथाचे लेखक भास्करभट्ट बोरीकर यांनी ‘शिशुपाळवधा’सारखा रसाळ पौराणिक ग्रंथ रचला, तर नृसिंहाने ‘ नलोपाख्यान’ रचिलें.
लेखक | कुसुमावती देशपांडे – Kusumavati Deshpande |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 223 |
Pdf साइज़ | 15.3 MB |
Category | साहित्य(Literature) |
Also Read
मराठी कादंबरी – Marathi Kadambari Book/Pustak Pdf Free Download