मराठी ज्योतिर्गाणित पुस्तक – Marathi Astrology Book Pdf Free Download
Marathi Astro Mathematical Series
पंचांगांतील ग्रहणांच्या स्पर्शमोक्षकालांत पाव पळापेक्षां – जास्त अंतर पडत नाही. ग्रहांच्या स्थानांत फार झाले तर ७ा० विकला अंतर पडतें. पण आमच्या ग्रहलाघवी पंचांगाकडे पहा. ग्रंहणांच्या स्पर्शमोक्षकालांत १॥
२ घटिकांचे अंतर बहुशः असा-. वयाचेंच. पंचांगांन ग्रहण दिलेले असून ते घडू नये, आणि दिलेले नसताही तें घडावें असेही प्रसंग केव्हां केव्हां येतात. यंदांची ( शक १८3६ ) ग्रहणें अशा प्रसं- गाची ताजी उदाहरणे आहेत.
ग्रहस्थाने तर रा अंश चुकलेली असतात, नांव भरतलंड पण काशीपासून रामेश्वरापर्यंत एक देखील वेधशाळा नसावी यापेक्षा जास्त आश्चर्याची गोष्ट कोणती !
ग्रहणे अस्तोदय या सहज दृष्टोत्पत्तीस येणाऱ्या गोष्टी चुकलेल्या पाहून तेवढ्या वेळेपुरतें आश्रवर्य व हळहळ करावी आणि पुन्हा चुकलेल्या पंचांगाप्रमाणे नित्यक्रम चालू ठेवावा ही लज्जास्पद गोष्ट हल्ली आमच्या अगदी अंगवळणीं पडून गेली आहे.
अष्टम्यंत तर १०।१५ घटिकांनी चुकला असतो. आमच्या देशांत ज्योतिःशास्त्राची उपपत्ति जाणणाऱ्या विद्वानांचा वर्ग उत्पन्न झाल्या- शिवाय शुद्ध पंचांग प्रचारांत येण्याचा मुळीच संभव नाहीं, हें प्रस्तुत ग्रंथाचा हेतु. जाणून आम्ही हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिण्यास प्रवृत्त झालं आहो.
याचा मुख्य हेतु आमच्या मुशिक्षित बांधवांना ज्योतिः. शाखासंबंधी गणिताची उपपत्ति कळवावी व तद्वारां या शास्त्राची त्यांना गोडी लावावी हा आहे. हल्ली मराठी भाषा बोलणारांची संख्या व व्याप्ति बरीच मोठी आहे. ठिकटिकाणी ट्रेनिंग, कालेजें स्थापन झाली आहेत.
या पुस्तकाचे पद्धति आणि उपपात्ति असे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागांत ग्रंथाची रचना. कोष्टकांवरून गणित करण्याची पद्धति सांगितली आहे. ती: सहज ध्यानात ठेवितां यावी यासाठी शक्य असेल तेथे
समीकरणरूप सूत्रांनी व्यक्त केली आहे आणि शेवटी उदाहरणे: देऊन स्पष्ट केली आहे. मोठी उदाहरणे थोडक्या जागेत व्यवस्थितपणे कशी मांडावीं तें न्यासांनी दाखविलें आहे.
ग्रहांची स्थानें दोन तीन कलांच्या तफावतीनें वेधांशीं जुळली तर पुरे असे आम्ही मानिलें आहे. म्हणून त्यांचे लहान लहान आकर्षण- संस्कार सोडून दिले आहेत. भोग व संस्कार प्राचीन संप्रदायाप्रमाणे राश्यंश कला त्मक न देतां दशांशपद्धतीने अंशात्मक दिले आहेत.
त्यामुळे जागा थोडी लागून गणितश्रमही वांचतात. उपपत्ति शक्य तितकी आरुति देऊन भूमितिपद्धतीनें व्यक्त केली आहे. असें करितांना व्यारव्येय वस्तु व्याख्यानापासून स्पष्ट निराव्या दिसाव्या म्हणून त्या इंग्रजी अक्षरांनी दाखविल्या आहेत.
लेखक | वेंकटेश बापूजी केतकर – Venkatesh Bapuji Ketkar |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 146 |
Pdf साइज़ | 15.7 MB |
Category | Astrology |
मराठी ज्योतिर्गाणित पुस्तक – Marathi Astrology Book Pdf Free Download