गणित अध्यायांचे सोपपत्तिक भाषांतर – Ganitache Sampattik Bhashantar Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश
आता ज्या वेळी सद्याधिमास येत असून अहर्गणपद्धतीने तो येत नसल्यास लब्धाधिमासामध्यें १ मिळवून त्यांपासून अहर्गण साधावा. ज्या वेळीं स्पष्ाधिमास येत नसून अहर्गण पद्धतीने अधिमास येत असल्यास लब्धाधिमासातून १ वजा करून अहर्गण साधावा.
तसेंच रवि व चंद्र याचे साधन कर- ण्याकरितां अधिमासशेष हे कल्पाधिमासाच्या ३० पटींनी युक्त किंवा रहित यथासंभव घ्यावे. व चैत्रादि गतमास हे सैक किंवा निरेक यथासंभव घ्यावे.
उपपत्ति- ग्रह करण्याकरितां अहर्गण पाहिजे. तो अहर्गण बरोबर समजण्या करितां स्पष्टाधिमासच कळले पाहिजेत. तेव्हां स्पधाधि मास येत असून अर्गणपद्धतीने तो अधिमास येत नसल्यास स्पष्टाधिमास हिशेवांत घेणें साहजिक आहे.
व अहर्गणपद्धतीने तो येत असून स्पष्ट अधिमास येत नसल्यास तो हिशेबांत न घेणे हेही साहजिक आहे. व अधिमास शेषाची वाढ प्रत्यहीं कल्पाधिमासाइतकी असते असे या प्रकरणाच्या पहिल्या श्लो काच्या उपपत्तीमध्यें दाखविलें आहे.
तेव्हां स्पष्टाधिमास हिशे बांत घेतल्यामुळें अहर्गण ३० दिवस अंतरित झाला तेव्हां वाढ जी कल्पाधिमासरूप तिची ३० पट आधिशेषांत मिळवून रवि चंद्रांचें साधन केलें पाहिजे.
तसेंच चैत्रादि गतमाससुद्धां सैक किंवा निरेक यथासंभव करून त्यांपासून अहर्गण साधावा, हैं उघड आहे. हणून इष्टसिद्धि झाली.
प्राक्ती योजनसंख्यया कुपरिधिः सत्पांगनंदाब्धय- स्त्यासः कुभुजंगसायकभुवो थ प्रोच्यते योजनंन् । याम्योदकपुरयोः पलांतरहतं भूवेष्टनं मांशहद् तज्गक्तस्य पुरांतराध्यन इह ज्ञेयं समं योजनम् ॥ १ ॥
योजनात्मक भूषरिधि ४१६७ इतका आहे, व पृथ्वीचा व्यास १५८१ योजनात्मक आहे. या भूपरिधीस एकाच याम्यो- त्तर वृत्तामध्ये असलेल्या दोन स्थळांच्या अक्षांशांच्या अंतराने गुणून ३६० नीं
भागून जें लब्ध येईल तितके विभाग त्या दोन स्थळांतील मार्गाचे केले असता त्यांतील प्रत्येक विभाग एकेक योजनाचा होईल. असल्या योजनाच्या मानाने देशांतर संस्कार करावा.
उपपत्ति- या श्लोकाच्या पूर्वार्धाची उपपत्ति गोलाध्यायामध्ये आहे. तथापि येथे दिक्प्रदर्शन करूं. प्रथमतः एकाच याम्योत्तर वृत्तां तील दोन स्थळांमधील अंतर मोजावें. व त्याच दोन स्थळां तील अक्षांशांचें अंतर करावें.
वरील त्रैराशिक उलट केल्याने स्थलांतर येईल. तें योजना – त्मक आचार्यांनी सांगितल्यामुळे त्याचे स्थलांतराइतके विभाग केले असतां एका योजना, मान सहज समजेल. हणून इष्टसिद्धि झाली.
लेखक | विनायक पांडुरंग शास्त्री खानापूरकर-Vinayak Pandurang Shastri Khanapurkar |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 395 |
Pdf साइज़ | 45.4 MB |
Category | विषय(Subject) |
गणित अध्यायांचे सोपपत्तिक भाषांतर – Ganitache Sampattik Bhashantar Book/Pustak Pdf Free Download