‘F.Y B.Com Marathi MCQ’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘F.Y B.Com Marathi MCQ’ using the download button.
F.Y B.Com Marathi MCQ Book PDF Free Download
F.Y B.Com Marathi MCQ Marathi
पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये (Features of Perfect Competition) :
पूर्ण स्पर्धेची संकल्पना अचूक समजण्यासाठी आपणास या स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची ओळख करुन घ्यावी लागेल.
१) असंख्य ग्राहक व असंख्य बिक्रेते (Large Number of Buyers and Sellers) :
पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक व विक्रेते यांची संख्या अमर्याद असते. परिणामतः एखादा ग्राहक अथवा एखादा विक्रेता आपल्या सामर्थ्यावर बाजारपेठेतील किंमतीवर प्रभाव पाडू शकत नाहीत.
एखाद्या ग्राहकाची मागणी अथवा एखाद्या विक्रेत्याचा पुरवठा हा एकूण मागणी व पुरवठ्याच्या अतिशय नगन्य भाग असल्याने वैयक्तिक मागणी अथवा पुरवठ्यातील वाढ अथवा घटीचा एकूण मागणी पुरवठ्यावर काहीही परिणाम होत नाही.
परिणामतः प्रचलीत किंमतीला खरेदी वस्तू अथवा विक्री करण्याशिवाय वैयक्तिक ग्राहक अथवा विक्रेत्याला पर्याय नसतो. अर्थात एकूण मागणी पुरवठ्यावरुन ठरलेली किंमत संपूर्ण बाजारावर राज्य करते.
२) एकजिनसी वस्तू (Homogenous Product):
पूर्ण स्पर्धेचे हे एक अतिशय महत्त्वाचे लक्षण आहे. वस्तूतील एकजिनसीपणा म्हणजेच उद्योगसमुहातील उद्योगसंस्थानी उत्पादित केलेले वस्तूंचे सर्व नग रंग, रूप, आकार, चव, वस्तूमान इ. बाबतीत पुर्णपणे एकसारखे असतात.
वस्तूचे सर्व एकजिनसी असल्यामुळे वस्तूचे दोन नग एकमकांस पूर्णतः पर्यायी असतात. यामुळेच विक्रेत्याचा किंमतीवरील प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो.
कारण एखाद्या विक्रेत्याने जास्त किंमत आकारली तर ग्राहक त्या वस्तूचा त्याग करुन इतर पर्यायाकडे वळतात. वस्तूच्या एकजिनसीपणामुळेच उद्योगपेढीस अथवा विक्रेत्यास बाजारात प्रस्थापित झालेली किंमत स्विकारणे क्रमप्राप्त असल्याने या बाजारातील एकजिनसी वस्तूच्या मागणीचा वक्र हा पूर्णपणे लवचिक किंवा ‘ox’ अक्षास समांतर असतो.
३) बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान (Perfect Knowledge of Market) :
पूर्ण स्पर्धेमधील ग्राहक व विक्रेत्याला बाजारपेठेचे पूर्ण ज्ञान असते असे गृहीत धरले
जाते. यामध्ये बाजारपेठेतील वस्तूंची किंमत, पुरवठा उपलब्धता, मागणीचे स्वरुप, मागणीची तीव्रता इ. विषयक ग्राहक व विक्रेता यांना कोणत्याही खर्चाशिवाय माहिती उपलब्ध होते असा अर्थ अभिप्रेत आहे. यामुळे प्रचलित किंमतीपेक्षा जास्त किंमत ग्राहक विक्रेत्याला देत नाही.
तसेच बाजारातील प्रचलीत किंमतीपेक्षा कमी किंमत विक्रेता स्विकारतही नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात या वैशिष्ट्यामुळेच ग्राहक व विक्रेत्याची फसवणूक होत नाही.
(४) मुक्त आगमन आणि निर्गमन (Free Entry and Free Exit) :
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात नविन उद्योगसंस्थांच्या प्रवेशावर अथवा जून्या उद्योगसंस्थांच्या निर्गमनावर कोणतीही बंधने नसतात.
एखाद्या उद्योगात अल्पकाळात असामान्य नफा मिळत असेल तर बाजारात नविन पेढ्या या नफ्याने आकर्षित होऊन प्रवेश करतात. याऊलट तोटा सहन करावा लागणाऱ्या पेढया बाजारपेठ सोडून जातात.
या वैशिष्ट्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात दिर्घकालात अवाजवी नफा (AR> AC) अथवा तोटा (AR AC) अशी स्थिती राहू शकत नाही. अर्थातच या बाजारपेठेत दिर्घकाळात फक्त वाजवी अथवा सामान्य नफा (AR= AC) प्राप्त होतो.
६) उत्पादन घटकांची गतिशिलता (Perfect Mobility of Factors) :
साधारणतः उत्पादनाचे चार महत्त्वाचे घटक आहेत. यात भूमी, श्रम, भांडवल व संयोजक यांचा समावेश होतो. पूर्ण स्पर्धेमध्ये हे चारही घटक पूर्णपणे गतिशील असतात. म्हणजेच हे चारही घटक एका उद्योगाकडून दुसऱ्या उद्योगाकडे किंवा एका उत्पादनातून दुसऱ्या उत्पादनासाठी विनासायास जावू शकतात. यामुळे उद्योगपेढ्यांना त्यांच्या मागणी- -पुरवठा स्थितीत आवश्यक ते समायोजन करणे शक्य होते.
५) वाहतुक खर्चाचा अभाव (Absense of Transport Cost) :
पूर्ण स्पर्धेचे हे अत्यंत महत्त्वाचे गृहितक आहे. या गृहिताचा अर्थ असा होतो की, दोन बाजारातील एकाच वस्तूच्या किंमतीमध्ये वाहतुक खर्चा एवढा फरक असतो. म्हणजेच वस्तूच्या किंमतीत वाहतुक खर्चाचा अंतर्भाव केला जात नाही. असा वाहतुक खर्च नसल्यामुळे वस्तूंचा एकजिनसीपणा टिकतो अन्यथा इतर काही वस्तूंच्या किंमती अधिक राहिल्या असत्या.
७) सरकारी नियंत्रणाचा अभाव (Absence of Government Regulations ):
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात समान किमतीचे अस्तित्व असते परिणामतः वस्तूंच्या किमत निर्धारणात शासनाला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करावा लागत नाही. तसेच पूर्ण स्पर्धेत ग्राहक व विक्रेत्यांना मुक्त आगमन व निर्गमन करता येत असल्याने सरकारचे बाजारावर नियंत्रण नसते.
वर विश्लेषण केलेल्या एकूण सात वैशिष्ट्यांपैकी पहिली तीन वैशिष्ट्ये ज्या बाजारात आढळतात त्या बाजाराला शुद्ध स्पर्धायुक्त बाजार (Pure Competition) असे म्हटले जाते. तर ज्या बाजारात वरिल सर्व लक्षणे आढळून येतात त्या बाजारास पूर्ण स्पर्धायुक्त बाजार असे म्हणतात.
You can download the Final Year B.com Marathi MCQ question paper from its official website of the college i.e. http://tmccollegemangaon.ac.in/, or it can be directly downloaded from the link given below.
Author | – |
Language | English |
No. of Pages | 4 |
PDF Size | 0.47 MB |
Category | Education |
Related PDFs
JEE Advanced Question Paper 2023 PDF
F.Y B.Com Marathi MCQ Book PDF Free Download