छावा कादंबरी शिवाजी सावंत | Chhava Novel PDF In Marathi

‘छावा कादंबरी शिवाजी सावंत’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Chhava Novel’ using the download button.

छावा कादंबरी – Chava Novel PDF Free Download

छावा कादंबरी शिवाजी सावंत

“अस्सं! जगदंब, जगदंब!” राजांच्या कपाळीचे शिवगंध, सईबाईंच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले. नकळतच त्यांच्या हाताची सडक बोटे छातीवरच्या माळेतील सफेद कबड्यांवरून फिरली.

दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जिनावर टाकीत राजे मांड मोडून घोडाउतार झाले. शांत पावली विश्वासजवळ जात त्यांनी काही न बोलता त्याचा खांदा हळुवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकनू खेचून त्यांनी ते विश्वासला दिले.

मागच्या घोडदळातील माणकोजी, मुरारबाजी, येसाजी, तान्हाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायउतार झाली होती. त्यांना दौडीतले मावळे पगड्यांना झटके देत ‘कसली खबर ?’

म्हणून विचारू लागले. ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलूखभर पसरतो तशी ती खबर घोडदळभर पसरली. ती ऐकताना न राहवून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत,

आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली ‘आई भवानीचा उदो ऽ! हर 5s हर 5 हर ss महादेव!” सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले.

राजांनी मागे वळून हसत आपल्या जानकुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली. विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर टेकवून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकरांच्या हाती दिली.

निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले . ज्येष्ठ शुभ द्वादशेस, गुरुवारी दहाव्या घटिकेस थोरल्या सूनबाईंस पुत्ररत्न प्राप्त जाहले.

जगदंबेच्या आशीर्वाद करोन आम्ही ‘थोरल्या आऊ’ जाहलो.’त्या बोलांनी राजांचे मन न्हाऊन निघाले. धावणीचा शिणोटा पार पसार झाला.

निळोपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लाल गोंड्यांचा फासबंद आवळला आणि सप् सप् सप् करीत, टपटपीत पाणथें पुरंघरच्या परतीवरचा राजांचा शेवटचा

मुक्काम पुण्याच्या लालमहालात पडला. या लालमहालाशी त्यांच्या कैक आठवणी जखडबंद झाल्या होत्या! उमर कवळिकीची असताना याच लालमहालाच्या उंबरठ्यावरचे मावाभरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या.

त्या वेळी ‘एवढं भलं मोठं माप यांना दिसलं कसं नाही ?’ याचं राजांना हसू आलं होतं! आज त्यांना आपल्या त्या विचाराचं हसू येत होतं.

लेखक शिवाजी सावंत-Shivaji Sawant
भाषामराठी
एकूण पृष्ठे 438
PDF साइज़8 MB
Categoryकादंबरी(Novels)

Also Read

मृत्युंजय कादंबरी PDF

छावा कादंबरी – Chhava Novel Book/Pustak PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!