तोत्तोचान कहानी | Totto Chan PDF In Marathi

तोत्तोचान – Totto Chan Book/Pustak PDF Free Download

रोजच्यासारखीच बैंडवाल्यांची वाट पहात असणार. तैयन्यात तिनं कुणालातरी हाक मारली, ‘ए. तुम्ही काय करता आहात? माझ्या जागेवरुन तौ कोणाशी बोलतेय हेच मला दिसेना आणि काय चाललय ते समजेना.

तेवढ्यात तिन पुन्हा हाक मारली, “ए. तुम्ही काय करता आहात? ती रस्त्यात कुणाला हाक मारत नव्हती तर वर पाहून कुणाशी तरी बोलत होती. मला राहावेना. मौ उत्तर ऐकण्याचा प्रयत्न केला.

पण काहीच ऐकू आलं नाही आणि तोतोचान तर इतक्या वेळा तोच तोच प्रश्न विचारत होती की मला शिकवण्यात अडथळा यायला लागला.

शेवटी मी खिडकीशी जाऊन कोण आहे ते पाहाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी खिडकीबाहेर डोक काढून बर पाहिल तेव्हा दिसलं, की तिथे एक चिमण्यांची जोडी होती आणि त्या दोन चिमण्या वर्गाच्या वळचणीला घरटे बांधत होत्या.

ती चिमण्यांशी बोलत होती. आता चिमण्यांना बोलू नका असं गी ग्हणत नाही, कारण मुलांच्या आवडी मला समजतात. पण तरीही तास चालू असताना मध्येच “तुम्ही काय करता आहात असं चिमण्यांना विचारायचं म्हणजे… “

आईनं माफी मागण्यासाठी काही बोलण्याआधीच बाई म्हणाल्या, “नंतर आमचा चित्रकलेचा तास होता. मी मुलांना जपानचा झेडा काढायला सांगितला,

इतर सगळ्यांनी तो बरोबर काढला: पण तुमच्या मुलीन मात्र नौसेनेचा झेडा काढायला सुरुवात केली. तुम्हाला माहितेय त्याच्यावर “किरण रंगवलेली असतात? मी म्हणते तेही एकवेळ ठीक आहे.

पण अचानक तिनं त्याच्याभोवती किनार रंगवायला सुरुवात केली. युवकदलाच्या फलकावर असते नं? तशी. तिनं कुठंतरी पाहिली असणार,

ती नेमक काय करतेय हे मला समजण्यापूर्वीच तिनं पिवळ्या तेली खडूनं किनार काढली होती आणि ती सरळ कागदावरुन डेस्कावर गेली होती.

तिच्या त्या झेडधानंच सगळा बाईनाही फार त्रास झालाय.” आईला आता काहीतरी करणं भागच होत. कारण इतर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनही ते महत्त्वाचं होतं. तिला दुसरी शाळा शोधायला हवी होती.

अशी शाळा, की जिथे तिच्या चिमण्या पोरीला समजून घेतील. आणि इतर लोकांत मिळून-मिसळून राहायला शिकवतील. चूक काय झाली हेच समजलं नसतं. आणि उगीच तिच्या मनातला गोधळ वाटला असता.

म्हणून तिन तोत्तोचान मोठी होईपर्यंत काही सांगायचं नाही असं ठरवून टाकलं होतं. आई फक्त एवढंच म्हणाली, “तुला नवीन शाळेत जायला आवडेल? मी एका खूप छान शाळेबद्दल ऐकलं,” चालेल…. पण. तोत्तोचान क्षणभर घोटाळली.

Read: Totto Chan PDF In English

लेखक तेत्सुको कुरोयांगी – Tutsuko Kuroyangi
भाषामराठी
एकूण पृष्ठे 75
Pdf साइज़4 MB
Categoryमुलांचे पुस्तक(Children)

तोत्तोचान – Tottochan Book/Pustak PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!