नक्षत्र विज्ञान | Science Of Star Astrology PDF In Marathi

नक्षत्र ज्योतिष विज्ञान – Nakshatra Jyotish Vigyan Book PDF Free Download

सभी नक्षत्र के बारेमें

हेमंत व शिशिर या ऋतूंत अंधाऱ्या रात्री आकाशाकडे पाहिले तर माठी मौज दिसते. तो नक्षत्रांनी गजबजलेला आकाशगंगेचा भव्य व लांब गेलेला पट्टा. ते सप्तर्षि लुब्धक अगस्त्य ब्रह्महृदय यांसारखे तेजःपुंज तारे, गुरुशु- क्रासारखे ठळक ग्रह,

मध्येच एकाएकी अंधारांत काडी ओढल्याप्रमाणे दिस णारी उल्का, ती प्रतिपदेची चंद्राची कोर, व तिच्या पोटांतील भूप्रकाश या गोष्टी पाहून क्षणभर ज्याचे मन तल्लीन होणार नाही असा मनुष्य कचित.

प्राचीन काळी आर्य लोकांची गाणी आमच्याहन निराळी असे. त्यांच्या शी पंचांग व घड्याळें मुळीच नव्हती. रोजच्या संकल्पांतील अयने ऋतु मास, तिथि, नक्षत्रे या गोष्टी त्यांना आकाशाकडे पाहून ठरवाव्या लागत.

त्यामुळे त्यांचे आकाशदर्शन कधीहीचुकत नसे व संकल्प ही सत्य होत असे. पण हल्ली पंचांगाचा सुकाळ झाला आहे. पंचांगाचा उपयोग करूं नये अमें आमी ह्मणत नाही.

पण जी पंचांग आपण वापरतो त्याप्रमाणे आकाशांतील गोष्टी घडून येतात किंवा नाहीत याकडे आमचे लक्ष असले पाहिजे, घ्रडयाळ वापरणाराने आपले घड्याळ ठीक चालले आहे किंवा नाही याविषयी रोज चौकशी केली पाहिजे.

अशी चौकशी न करितां वर्षभर त्याला किल्ली देत गेल्यास घडयाळांत प्रातःकालचे ६ वेटे झाल्यावेळी आकाशांत भर दोन प्रह- रची वेळ दृष्टीस पडण्याचा प्रसंग येईल.

वर सांगिल्याप्रमाणे केवळ धार्मिक दृष्ट्या नक्षत्रविज्ञानाचा उपयोग आहे असे नव्हे. विचारशक्तीला उत्तम वळण देणारे असे एकादें शास्त्र असेल तर तें जोतिःशास्त्र आहे.

आणि या प्रगल्भशास्राचा नक्षत्रविज्ञान हा पाया असल्यामुळे याचे महत्व निराळे सिद्ध करून दाखविण्याची आवश्यकता नाही. या- साठी नक्षत्रविज्ञान या विषयाच्या मूलतत्वांचा भूगोलवर्णनाप्रमाणे मुलाच्या शिक्ष णक्रमांत समावेश होणे अत्यंत जरूर आहे.

देशभाषेच्या उच्चतम अशा ७ व्या इयत्तेंत शास्त्रीयविषयाबरोबर हा विषय समाजावून दिला तर बिद्यार्थीना विशेष आनंद व समाधान वाटेल.

एकादी गोष्ट लहानपणी सहज व उल्हासवृत्तीने शिकण्याजोगी असून तिजकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठेपणी त्याबद्दल खिन्नता वाटण्याचे प्रसंग येतात.

हल्ली पदवीधरांना देखील बहुशः गुरु शुक्रासारख्या ग्रहांची ओळख नसते मग नक्षत्राचे नांव कशाला. त्यांना आकाश दणजे पृथ्वीरूपी घराचे एक छत यापेक्षा जास्त त्याचें महत्व वाटत नाहीं. याचें ही कारण पूर्वोक्त शिक्षणक्रमांतील न्यूनता होय.

असो या पुस्तकाच्या वाचनाने वाचकांच्या मनांत ईश्वराच्या अगाध लोलेविषरयीं पूज्यभाव व चौकसपणा यांची आवड उत्पन्न होईल तर हैं पुस्तक लिहिण्याचे श्रम व्यर्थ गेले नाहीत असें आझी मानू

लेखक वेंकटेश केतकर-Venkatesh Ketkar
भाषामराठी
एकूण पृष्ठे 79
Pdf साइज़10.6 MB
Categoryज्योतिष(Astrology)

नक्षत्र विज्ञान मराठी ज्योतिर्गणित – Nakshatra Vigyan Book Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!