मराठी कहानी – Marathi Katha Pdf Free Download
मराठी कथा का संग्रह
नंदूने एक मोठी उडी मारली आणि तो त्या खडकावर पोचला. मग तिथून आणखी एक उडी मारली आणि तो थेट बेटावरच पोंचला. खरं तर हे फारच धोक्याचं होता पण नंदू काही कमी धाडसी नव्हता।
नंदनं बेटावरचे मनसोक्त आंबे खाल्ले आणि मजेत फिरून झाल्यावर खडकावर परत एकदा उडी मारून गेला होता तसाच तो परत घरी आला. त्यान आपल्या आई-बाबांना या बेटाबद्दला सांगितले.
आपल्या मित्रांना तर त्यानं आपल्याबरोबर बेटावर यायचं आमंत्रण देखील दिलं. “बेट फार दूर आहे. आम्ही नाही येणार” असं म्हणून मित्र त्याच्याबरोबर यायला तयार नव्हते.
भूक लागली की नंद एकटाच बेटावर जायचा. पावसाचे दिवस होते. नदीचं पाणी बरच वाढलं होत, नदीतला खडक बराच पाण्याखाली गेला होता.
एक दिवस नंद बेटावरुन परत यायला निघाला तेव्हा खडकाचा अगदी थोडासाच भाग दिसत होता. नंदू काळजीपूर्वक खडकावर उडी मारण्याच्या बेतातच होता पण तो एकदम थांबला.
“असं कसं झालं? खडक तर आता पहिल्यापेक्षा अचानक मोठा कसा काय झाला? यात नक्कीच काहीतरी धोका असणार।” थोडा विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली.
नंदूनं मोठ्यानं विचारलं, “खडक्दादा, तू ठीक आहेस ना?” पण काहीच उत्तर आलं नाही. नंदून परत मोठ्यानं विचारलं, “आज तू बोलत का नाहीस?” खडकावर झोपलेल्या मगरीला वाटलं.
हा खडक बहुधा रोज या माकडाशी बोलत असेल. “अरे दादा,तू काय म्हणत होतास?” मगरीन विचारलं. तिचं डोकं आणि शेपूट पाण्यात लपलेले होते. नंदूला मगरीची युक्ती समजली.
तो म्हणाला, “तू मगर आहेस ना? तुला काय हवंय?” मगरीनं रागावूनच उत्तर दिलं, “मी तुला खाणार आहे.”
नंदू विचारात पडला, ‘आता या मगरीपासून सुटका कशी करून घ्यावी? मग त्याला एक उपाय सुचला. तो म्हणाला, “मगरताई, एवढंच ना? तू तुझं तोंड जितकं मोठं उघडता येईल, तितक उघड.
मी सरळ तुझ्या तोंडातच. उड़ी मारेन. पण तू डोळे मात्र अगदी घट्ट मिटून घे. माझी उडी जर चुकली, तर तुझ्या डोळ्यांना लागेल ना.” मूर्ख मगरीनं आपले डोळे पट्ट मिटून घेतले आणि तोंड उघडून वाट पाहू लागली.
नंदून नीट लक्ष देऊन बरोबर मगरीच्या पाठीवर उडी मारली आणि दुस-याच उडीत पलीकडच्या किना-यावर पोचला. जातक कथा
लेखक | – |
भाषा | मराठी |
एकूण पृष्ठे | 404 |
Pdf साइज़ | 56.7 MB |
Category | कथा(Story) |
100+ मराठी कहानी – Marathi story Pdf Free Download