कोसला कादंबरी भालचंद्र नेमाडे | Kosala Novel Marathi PDF

‘कोसला कादंबरी भालचंद्र नेमाडे’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Kosala Novel Marathi’ using the download button.

कोसला कादंबरी – Kosala Novel PDF Free Download

कोसला कादंबरी भालचंद्र नेमाडे

म्हणतो, “तेव्हापासून मी निश्चय केला, उंदीर आपला शत्रू.’ मग हा उंदीर-द्वेष सांगवीकर मॅट्रिकपर्यंत जोपासत आणतो (किंवा, आपल्याला स्वतः

ची गोष्ट सांगणारा निवेदक सांगवीकर हा उंदीर-द्वेष मॅट्रिकमधल्या सांगवीकरपर्यंत जोपासत आणतो). आणि मॅट्रिकच्या वर्षी एक संपूर्ण रात्र सांगवीकर तिरीमिरीने आणि

तिडिकेने एका उंदरामागून धावत घालवताना आपल्याला दिसतो. शेवटी तो उंदीर निसटून आणि दुसरेच दोन उंदीर मरून सांगवीकरची फजिती करतात.

थकून गेलेला आणि हताश झालेला सांगवीकर ते उंदीर फेकण्यासाठी गच्चीवर जातो आणि तिथेच “जरा आडवा” होतो. त्या वेळी पहाट होत आलेली असते,

चांदण्यांमधून उजेड पसरू लागलेला असतो आणि श्रांत सांगवीकर झोपेच्या काठावर असतानाही “डोळे उघडे” ठेवून लवंडतो. कारण क्षणभरापूर्वी उंदीर फेकून देताना तो “पूर्वेकडे पहात” राह्यलेला असतो.

आणि क्षणभरानंतरच त्याला वाटणार असतं की “कशात काही अर्थ नाही.” थंडगार वाऱ्यात किंचित बरं वाटत असलेला उघड्या डोळ्यांचा सांगवीकर म्हणतो :

“मला वाटलं कशात काही अर्थ नाही. मग मी ज्यास्तच हातपाय पसरून डोळे मिटून घेतले.’’ डोळे मिटून घेणाऱ्या सांगवीकरला झोप लागत नाही.

तो आत पूर्ण जागा होतो. वाया गेलेली रात्र आणि त्याच पद्धतीने वाया जाणारे दिवस त्याला सलू लागतात. आणि अवतीभवतीच्या लहानमोठ्या गोष्टी जणू त्याच्या अंगाला खुपू लागतात :

लोक आणि प्राणी व आवाज आणि दृश्य ह्या सगळ्यांचं मिळून त्याला “ओझं वाटतं. फक्त स्वतःच्या वर्तुळात वळून पाहिलं तरी दोन-दोनदा तयार झालेला अभ्यासही त्याला आश्वासक वाटत नाही.

येऊ घातलेली परीक्षा नजीकच्या भविष्यात उभी असताना आणि अंगात आयुष्यात तिची फिकीर असूनही सांगवीकरचं “लक्ष लागत नाही.

” हे अकारण किंवा सकारण तक्रार निवेदन नाही. हे लक्ष न लागणं अकर्मक आहे. त्याला बाह्य विषय नाही. ते इतरत्र किंवा इतस्ततः वळलेलं नाही.

कारण स्वतःशी स्वतःचं अख्खं जग लक्षात घेतल्यावर ते लक्ष न लागणं उरून राहतं (अथवा सुरू होतं). लक्ष न लागणं ही सांगवीकरची स्वत:च्या वातावरणातील एखाद्या वस्तूबद्दलची समजूत,

अनुभव वा प्रतिक्रिया नाही. “लक्ष न लागणं” ही खुद्द सांगवीकरचीच अकर्मक अवस्था आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तिचा संबंध त्याच्या संपूर्ण वातावरणाशी, त्याच्या जगाशी आहे.

लेखक भालचंद्र नेमाडे-Bhalchandra Nemade
भाषामराठी
एकूण पृष्ठे 8
Pdf साइज़5 MB
Categoryकादंबरी(Novels)

Also Read

मृत्युंजय कादंबरी PDF

कोसला कादंबरी – Kosala Novel Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!