छत्रपति शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj PDF In Marathi

‘छत्रपति शिवाजी महाराज’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Chhatrapati Shivaji Maharaj ‘ using the download button.

छत्रपति शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj PDF Free Download

मराठ्यांचा उदय

बहमनी साम्राज्याच्या विभाजनानंतर स्थानिक हिंदुंना शाही राजवटीत काही प्रमाणात स्थान मिळू लागले याचा उल्लेख मागे केला आहेच.

मात्र सोळाव्या शतकामध्ये शाही राजवटीत स्थानिक हिंदुंना मर्यादित प्रमाणात स्थान मिळालेले दिसून येते.

‘बुरहाने मासीर’ या समकालीन ग्रंथावरून दलपतराय, कान्हु नरसी, साबाजी इत्यादी हिंदु व्यक्तींनी शाही राजवटीत अधिकार भू असे दिसून येते.

सोळाव्या शतकाच्या अखेरीस मुघलांनी दक्षिणेत प्रवेश केल्यानंतर शाही राजवटींनी आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी स्थानिक हिंदुंना लष्करात आणि मुलकी व्यवस्थेत मोठया प्रमाणावर स्थान देण्यास सुरुवात केली.

विजापूरच्या आदिलशहाने आपल्या लष्करात खास मराठा पथक उभारले. गनिमी काव्याने लढाई करण्यास हे पथक अतिशय निष्णात होते.

आदिलशाही प्रमाणे निजामशाहीही मराठ्यांना लष्करात प्रवेशतर मिळालाच, पण त्याचबरोबर अधिकारांच्या जागाही मिळू लागल्या.

प्रामुख्याने लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांना शाही राजवटीत मुर्दुमकी गाजविण्याची संधी प्राप्त झाली. त्यातूनच मराठ्यांचा उदय होऊन काही मातब्बर मराठा घराण्यांचा उत्कर्ष झाला.

आदिलशाही मध्ये चंद्रराव मोरे, झुंझारराव घाटगे, माने, घोरपडे, डफळे, सावंत, नाईक-निंबाळकर इत्यादी मराठा सरदारांचा उत्कर्ष झाला.

निजामशाही मध्ये जाधवराव आणि भोसले या दोन मराठा घराण्यांचा उत्कर्ष झालेला आढळून येतो. अहमदनगरच्या निजामशाहीत उत्कर्ष पावलेले जाधवराव हे घराणे मूळचे वऱ्हाडातील सिंदखेड या गावचे होते.

देवगिरीच्या यादवांच्या वंशाशी हे घराणे संबंधीत होते असे म्हटले जाते. सोळाव्या शतकाच्या अखेरीस लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मोठे प्रस्थ होते.

त्यांची मुलगी जिजाबाई ही शहाजीची पत्नी आणि शिवाजीची आई होय. निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे.

या घराण्याच्या संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला.

त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असा इतिहासकारांचा तर्क आहे. मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी बाबाजी भोसले (१५४८ ते १५९९) यांच्यापासून सांगता येते.

या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इ.स.१४७० च्या एका फर्मानावरून स्पष्ट होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष ‘राणा’ ऐवजी ‘राजा’ ही पदवी धारण करू लागले. बाबाजी भोसले हे मराठवाडयातील वेरूळ या गावचे पाटील होते.

निजामशाहीमध्ये उत्कर्षास आलेले दुसरे महत्त्वाचे घराणे म्हणजे भोसले घराणे. या घराण्याच्या संबंध शिसोदे या राजपूत वंशाशी जोडला जातो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिसोदे घराण्यात भैरवजी उर्फ भोसाजी हा कर्तबगार पुरुष होऊन गेला. त्याच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडले असावे असा इतिहासकारांचा तर्क आहे.

मात्र भोसले घराण्याची विश्वसनीय वंशावळी बाबाजी भोसले (१५४८ ते १५९९) यांच्यापासून सांगता येते. या वंशातील पुरुषांना राणा अशी पदवी होती. हे इ.स. १४७० च्या एका फर्मानावरून स्पष्ट होते. कालांतराने भोसले वंशातील पुरुष ‘राणा’ ऐवजी ‘राजा’ ही पदवी धारण करू लागले.

बाबाजी भोसले हे मराठवाडयातील वेरूळ या गावचे पाटील होते. निजामशाही राजवटीत वेरूळजवळ असलेल्या दौलताबाद या किल्ल्याचे विशेष महत्त्व वाढले, बाबाजी भोसले यांनी निजामशाहीत बरीच कर्तबगारी गाजविली म्हणून शाही सुलतानाकडून नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव या गावची जहागीर बाबाजी भोसले यास मिळाली.

पांडे पेडगाव हे गाव आदिलशाही व निजामशाही यांचा सरहद्दीवर असल्याने येथील जहागिरी सांभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते. ही कुवत बाबाजीजवळ असल्यामुळे निजामशहाने त्याला ही जहागिरी दिली असावी.

बाबाजी हा चार-पाच गावाचा मोकदम आणि दोन गावाचा देशमुख असल्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक परिस्थीती निश्चितच चांगली होती. बाबाजीची दोन मुले-विठोजी आणि मालोजी हे कर्तबगार निघाले. इ.स. १५८८-८९ मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत मालोजी व विठोजी यांनी मोठा पराक्रम गाजविला.

दीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली. या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा मालोजी व विठोजी यांचेकडे वहिवाटीस आला. या सुमारास मालोजीचे वय केवळ चौदा-पंधरा वर्षांचे होते. इ.स. १५९१ ते १५९५ या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त संघर्ष चालू होता. या संघर्षात निजामशहाच्या वतीने मालोजीने अनेक लढायांत पराक्रम गाजविला. त्याबद्दल बुऱ्हाण निजामशहाने त्याचा सरंजाम पाच हजारपर्यंत वाढविला. त्यामध्ये सुप्यासारख्या परगणा मालोजीकडे वहिवाटीस आला.

बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले. मलिक अंबर आणि मिआन राजू या दोन सरदारांमध्ये सत्तास्पर्धा निर्माण झाल्या.

मूर्तजा निजामशहाला मलिक अंबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले. म्हणून त्याने मिआन राजू वर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार दिले.

त्यातून मलिक अंबर व राजू यांत अनेक चकमकी होऊ लागल्या. मालोजी भोसले हा मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गढीमध्ये तो वास्तव्य करुन होता. मिआन राजूच्या सैन्याने इंदापूरच्या गढीवर हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारला गेला.

त्याच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा शहाजी हा केवळ पाच-सहा वर्षाचा होता. मालोजीच्या मागे विठोजीने १६११ पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीकडे आली.

मालोजीच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते. तिला शहाजी व शरीफजी अशी दोन मुले होती. त्या मुलांच्या नावासंबंधी बखरीत दिलेल्या कथांना कोणताही आधार नाही.

मलिक अंबरचे कर्तृत्व

बुराण निजामशहाच्या मृत्यूनंतर मुफ्त सम्राट अकबर याने अहमदनगर

पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रम गाजवून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून १९ ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगर जिंकून घेतले.

राजधानीचे शहर अहमदनगर हातचे गेल्यानंतरही मलिक अंबरने धीर सोडला नाही. मूर्तजा निजामशहा दुसरा याला मराठवाड्यातील परिंड्याच्या किल्ल्यात सुरक्षित ठेऊन दौलताबादजवळ असलेल्या खडकी या गावी मलिक अंबरने आपली नवी राजधानी उभारली. हे खडकी गाव पुढे औरंगाबाद या नावाने प्रसिद्धीस आले. निजामशाही वाचवण्याचे प्रयत्न चालू असतांना मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी असलेल्या मिआन राजूने मलिक अंबरला सर्वतोपरी सहाय्य केले.

अकबरानंतर मुघल सम्राट बनलेल्या जहांगीरने निजामशाहीचा उच्छेद करण्यासाठी शहानवाजखान नावाच्या सरदारास दक्षिणेत पाठविले. शहानवाजखानाने रोशन गावला मलिक अंबरचा पराभव करून फेब्रुवारी १६१६ मध्ये खडकी हे गाव लुटले. मलिक अंबरने मुघलाशी तह करून बालाघाटचा प्रदेश जहांगीरला दिला.

अशाप्रकारे एक मोठा पराभव मलिक अंबरला पत्करावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीत लखुजी जाधवरावाने निजामशाही सोडलो आणि तोही मुघलांना जाऊन मिळाला. अशा या आणीबाणीच्या काळामध्ये मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले.

लेखक P.N Deshpande
भाषा मराठी
कुल पृष्ठ 127
PDF साइज़9.1 MB
CategoryBiography

Relatead PDFs

The History of Shivaji: The Grand Rebel PDF

छत्रपति शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj Book PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!