भारतीय ज्योतिर्गणित | Bhartiya Astrology PDF In Marathi

भारतीय ज्योतिर्गणित – Bhartiya Astrology Book PDF Free Download

भारतीय ज्योतिर्गणित

या निबंधांत भारतीय ज्योतिषाची बहुधा एका विशिष्ट काळा चीच स्थिति दिली आहे. हा काळ भास्कराचार्यकृत सिद्धांत शिरोमणीचा होय. हा काळ भारतीय ज्योतिषाच्या अत्यंत पूर्णा वस्थेचा होता.

त्या ज्योतिषाच्या परिणत अवस्थेत त्याच्या विविध अंगांबद्दल जी प्रचलित प्रमेयें होती, ती सर्व त्यांच्या उपपत्तीसह सिद्धांतशिरोमणीत पहावयास सांपडतात.

त्या प्रमेयांहून भिन्न व वस्तुस्थितीशी अविसंबादि अशी प्रमेये त्यापूर्वीच्या व नंतरच्या काळांत आढळून येतात; नाही असे नाही. उदाहरणार्थ,

भास्कराचार्यापूर्वी झालेल्या आर्यभटाच्या सिद्धांतांत पृथ्वीची दैनंदिन गति मानिली आहे व त्यांच्यानंतर झालेल्या ग्रंथांत चंद्राचे फल- संस्काराशिवाय आणखी काही संस्कार मानिले आहेत.

या गोष्टी अर्थात्च अपवादरूप असून, पाश्चात्यांशी परिचय होण्यापूर्वी आप- णांकडे प्रचलित असलेल्या सिद्धांतांस परक्याच होत असे म्हटल्यास चालेल.

तथापि ज्याअर्थी या निबंधात भारतीयांच्या प्रमेयांची व सारण्यांची पाश्चात्यांच्यांशी तुलना केली आहे, त्याअर्थी त्यास मुख्य त्वेकरून आधारभूत असलेल्या ग्रंथाच्या पूर्व व उत्तर कालांतील भारतीय ज्योति शास्त्राच्या स्थितीची माहितीही देणें अवश्य आहे.

शिवाय कोणत्याही विषयाचा प्रगतिपर (dynamical) विचार केल्याने त्याच्या विशिष्टकालीन स्थितीवर चांगला प्रकाश पडतो हैं तत्व विद्वन्मान्य आहे, य या तस्वास अनुसरून या निर्ंधांत प्रतिपादिलेल्या विषयांचा पूर्वेतिहास देणे आवश्यक आहे.

या इतिहासांत प्रमुख गोर्थींचाच समावेश केला असून, त्यास मुख्यत्वेकरून के. रा. रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांच्या ‘ भार- तीय ज्योतिःशाखा’चा आघा सापेक्ष योग्यता कळण्यास मदत होईल,

व ज्या भारतीय ज्योति: शास्त्राच्या सौर, आर्य व ब्राह्म या शाखांस धीवृद्धिदतंत्र, सिद्धांत शिरोमणि, ग्रहलाघव, इत्यादि सुंदर फळे आली, त्याच्या काही मुळ्या वेदकालीन ऋषींच्या पर्णकुटिकांपयत,

कांहीं कौरवपांडवांच्या समरभूमीपर्यंत व काही ग्रीक उ्योतिष्यांच्या व्यासपीठांपर्यंत कशा पोोंचलेल्या आहेत हैं वाचकांस दिसून त्यांच्या कल्पनेस बरीच चमत्कृतिही वाटेल अशी खात्री आहे.

राविचद्रांचे उदयास्त व ग्रहणे, नक्षत्रांचे उदयास्त, ऋतूंचे आरंभ व अत, इ० चमत्कारांकडे मनुप्याचे लक्ष्य फार पुरातन काळा पासून लागणें साहजिक आहे.

रात्रीचे वेळी आकाशांतील तारकांच्या स्थितांवरून दिशा व काळ ओळखणे सोपे जाते; चंद्राच्या स्थिती वरून भरतीओहोटी काढितां येते; व सूर्याच्या स्थितीवरून ऋतु ओळखता येतात.

याप्रमाणे या चमत्कारांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेता येतो. या चमत्कारांपैकी कांहींचा म्हणजे प्राणी धूम- केतुदर्शन, उदयास्त सूर्यस्थिति किंवा चंद्रस्थिति, युति यांचा ईश्वरी क्षोम, पिके, विवाह, युद्धे. व्यक्तिविषयक सुखदुःसें इत्यादिकांशींही साहजिकच संबंध जोडण्यांत आला.

लेखक कृष्ण कोल्हटकर- Krishn Kolhatakar
भाषामराठी
एकूण पृष्ठे 280
Pdf साइज़21.5 MB
Categoryज्योतिष(Astrology)

Related PDFs

Cheiro Numerology PDF

वशीकरण मंत्र यानी मंत्र भंडार PDF

भारतीय ज्योतिर्गणित – Bhartiya Jyotirganit Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!