व्यक्ती आणि वल्ली | Vyakti Ani Valli PDF In Marathi

व्यक्ती आणि वल्ली – Vyakti Ani Valli Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

एकदा जमिनीवरचे वारे आणि समुद्रावरचे वारे शिकवीत होते.गोदाका, सांग वारा कुठल्या दिशेला वाहतोय?” “गोदाका वारा वाहतोय कुठल्या दिशेनं?”

गोदी आपली शंकू वाण्याच्या दुकानातल्या पोत्यासारखी बाकावरच दुप्प करून बसलेली. “काटें, बूड हलवून उभी राहा जरा आश्शी!” अगदी मॅट्रीकपर्यंतच्या मुलीलादेखील

‘बूड’ हलवून उभी राहा असे सांगण्यात काही गैर आहे असे चितळे मास्तरांनाही वाटत नसे आणि त्यांच्या पुढल्या शिष्यगणालाही वाटत नसे. मग गोदी खालचा ओठ पुढे काढून शुंभासारखी उभी राहायची.

“हां सांगा आता कुठले वारे वाहताहेत?” मास्तरांनाही विचारले, गोदी गप्प, “गोदुताई, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ-डोंगराच्या की समुद्राच्या?

राम्या तु सांग.” मग गोगट्यांच्या राम्या बिनदिकत गोदीला म्हणाला होता. एगोदे, नीट उभी राहा की “का रे राम्या?” मास्तर दटावायचे. “मग आम्हाला तिचा पदर नीट दिसणार कसा?”

“तिचा पदर कशाला दिसायला हवा?” “मग वारा डोंगराकडे की समुद्राकडे कळणार कस?” | “भोपळ्या, अरे परीक्षेत गोदीला का उभी करणार आहेस?” अरे.

दिवसा वाहतात ते लैंड विड्स की सी विड्स” नामुचे आमच्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. कोल्हापूरला एकदा त्याने आम्हाला सत्यनारायणाला बोलावले होते त्या वेळी हिने त्याची ‘फ्यामिली पाहीली होती.

“हो, कोल्हापुरला भेटलो होतो.” आमची बायकोही नामूला नको त्या सभ्य पातळीवर आणीत म्हणाली, “ती निराळी ही टेपनी.” कुठेही संकोचाचा लवलेश स्पर्श नाही.

मी आणि माझी पत्नी मात्र जागच्या जागी संकोचलो, “नामू..” मी उगीच विषय बदलीत म्हटले, “इंग्लिश पिक्चरमध्ये काय समजतं रे तुला?”

“फुकट पास आहे!” “ह्याही मॅनेजरचे कपडे तुच फाडतोस वाटतं?” “नाही, डोरकीपरचे साहेब, पण पिक्चर झकास आहे. लवशिन काय काय घातले आहेत. ट्रॉली निस्ती गार गार फिरवली आहे.

“माझ्या सुदैवाने अंधार झाला आणि पिक्चर सुरू झाला. सखाराम गटणे सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले.

माझे वाह्यात मित्र हे दृश्य पाहत होते. “आपण मला कदाचित ओळखलं नसेल..

लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे-Purushottam Laxman Deshpande
भाषामराठी
एकूण पृष्ठे 3
Pdf साइज़1 MB
Categoryकादंबरी(Novels)

व्यक्ती आणि वल्ली – Vyakti Ani Valli Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *