श्रीमान योगी कादंबरी | Sriman Yogi PDF In Marathi

श्रीमान योगी – Sriman Yogi Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते.

एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते.

रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयतांचे सारखे लक्ष जात होते. कोणी दृष्टिपथात येत नव्हते.

वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अधिक अस्वस्थ होत होते. ‘आबासाहेब, मासाहेब आल्या.’ शंभूराजे म्हणाले ‘कुठं?’ मान वर करीत शहाजीराजे विचारते झाले.

शंभूबाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणांत धुळीचे लोट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला.

आंबराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. तीन घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली. घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईच्या चेहऱ्यावर संभाजीला पाहून क्षीण हास्य उमटले.

जिजाबाई दासीच्या आधाराने पायउतार झाल्या. श्रमाने सारा चेहरा लालबुंद झाला होता. नेत्र आरक्त दिसत होते. तीन मासांच्या गर्भार जिजाबाईंनी आपला घाम टिपला.

पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोऱ्या आल्या. ‘अशी ठायी ठायी थांबत आम्ही दौड करीत राहिलो, तर तुमच्या बापाच्या हाती सापडण्यास फार वेळ लागायचा नाही.’

‘जवळच आपले व्याही विश्वासराव आहेत. त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप, तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल आहे…’

शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले, ‘हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे. त्याला आम्ही काय करणार? जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर पिढ्यान् पिढ्या चालवायला आम्हीही समर्थ आहोत, म्हणावं.’

‘मी काय बोलणार यात?’ जिजाबाई बोलून गेल्या. ‘तुम्ही म्हणता, तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल, तर तो तुम्हांला सोडून देईल, अथवा पळवून नेईल.

तुमचं नशीब आणि तुम्ही आम्हांला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं ?” आपले अश्रू कष्टाने आवरून, काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळल्या.

जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांचे व्याही विजयराव सिधोजी विश्वासराव खुद्द सामोरे आले; जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाताच शहाजीराजे म्हणाले,

लेखक रंजीत देसाई-Ranjit Desai
भाषामराठी
एकूण पृष्ठे 1676
Pdf साइज़4.54 MB
Categoryकादंबरी(Novels)

श्रीमान योगी – Sriman Yogi Book/Pustak Pdf Free Download

1 thought on “श्रीमान योगी कादंबरी | Sriman Yogi PDF In Marathi”

  1. DATTA VIJINATH GORE

    इतिहास माहिती साठी माणसाला पाहिजे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *