‘Housing Society Rules’ PDF Quick download link is given at the bottom of this article. You can see the PDF demo, size of the PDF, page numbers, and direct download Free PDF of ‘Housing Society Rules in Marathi’ using the download button.
Housing Society Rules Marathi PDF Free Download
Housing Society Rules PDF
माणसाच्या तीन मूलभुत गरजांपैकी एक गरज निवारा ही आहे. वाढती लोकसंख्या आणि उदरनिर्वाहासाठी अपरिहार्य स्थलांतर यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया अतिशय वेगाने होवू लागली आहे…
नगरातील या वाढत्या नागरीकांमुळे तिथे अर्थातच निवाऱ्यासाठी घरांची गरजसुद्धा झपाटयाने वाढली आहे.
नगरातील आधुनिक घरांच्या संकल्पनेत केवळ निवारा एवढी मर्यादित अपेक्षा समाविष्ट झ आलेली नाही.
तर आरामदायी सुविधादायी आणि आनंददायी निवारा अशा अनेक अपेक्षा समाविष्ट इ आलेल्या आहेत.
निवारा या संकल्पनेत अधिकाधिक सोईसुविधाबरोबरच आनंददायी, आरोग्यदायी, सुसंस्कृत, स्वतंत्र तरीही एकत्र असल्याची जाणीव वृद्धिंगत करणा-या वातावरणाची अपेक्षासुध्दा समाविष्ट होतांना दिसते.
गृहप्रकल्पांच्या जाहिरातींकडे दृष्टिक्षेप टाकला तरी हे सहज लक्षात येते.
शहरीकरणाच्या प्रक्रियेच्या वेगामुळे घरांच्या गरजेत वाढ झाली आणि लोकांनी एकत्र येवून भुखंड खरेदी करुन स्वखर्चाने गृहबांधणी करण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे.
त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांचा मूलभुत उद्देश सभासदांसाठी घरे बांधून निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देणे हे प्रत्यक्षात येण्याऐवजी मूलभूत सोईसुविधा पुरविणे, व्यवस्थापन करणे हा उद्देशच प्रत्यक्षात शिल्लक राहिल्याचे अनुभवास येत आहे.
विशेषतः महानगरात तर बांधकाम व्यावसायिकांनी गृहप्रकल्पांची बांधणी करुन सदनिकांची विक्री एकमेकांना अनोळखी असलेल्या अनेकांना करायची आणि अशा अनोळखी अनेकांनी सक्तिने एकत्र येवून सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करायची असाच अनुभव पदोपदी येतो..
सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायदा नियम आणि त्यावर आधारित पोटनियम याद्वारे सोईसुविधांच्या व्यवस्थापनाची नियमावली / कार्यपद्धती नमुद करुन दिलेली असली तरी मुळातच अनोळखी असलेल्या अनेकांनी परस्परांना परिचित होवून एकसंघ एकसमुहाने एकत्र येवून समान उद्देशांसाठी एकजिनसी समुह करण्याच्या दिशेने वाटचाल करण्या आधीच याच नियमावलीतील तरतुदींचा आधार घेवून अभेद्य भिंती एकमेकांत निर्माण करुन वितंडवादास सुरुवात केल्याचे दृश्य सर्रास निदर्शनास येतांना दिसते.
ही नियमावली एकमेकांपासून अनेकांना तोडणारी होवू नये.
ती एकमेकांना जोडणारी व्हावी, या उद्देशाने या नियमावलीचा परिचय सर्वांना व्हावा, म्हणुन कायद्यातील पोटनियमांतील तरतुद नेमकी काय आहे व समस्येतून वितंडवाद उद्भवू नये, म्हणून त्यांचा कसा उपयोग करता येवू शकतो याची सोप्या भाषेत एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध असण्याची गरज काही प्रमाणात तरी भागवली जावी, या उद्देशाने या हाउसिंग मॅन्युअलची संकल्पना साकारत आहे.
हे मॅन्युअल गृहनिर्माण संस्थांशी संबंधित अधिकारी, सभासद आणि व्यवस्थापक समिती सदस्य या सर्वांना उपयुक्त ठरावे, अशा उद्देशाने तयार करण्यात आले आहे. त्याचा उपयोग सर्वांनी वितंडवाद संपवून सुसंवाद साधण्यासाठी करावा, एवढीच अपेक्षा आहे.
महाराष्ट्र देशातील सहकार चळवळीत अत्यंत प्रगत असलेले राज्य आहे. भारतातील सहकार चळवळीची सुरुवात शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यापासून झाली.
त्यानंतर या चळवळीचा विस्तार आणि विकास विविध क्षेत्रात झाला वर्तमान काळात सकाळच्या चहा, साखर, दुधापासून थेट फळेभाजीपाला आणि विविध कारणांसाठी लहानमोठे कर्ज अशा प्रत्येक बाबतीत सहकार क्षेत्राचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे असे अनुभवास येते.
पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था सन १९९५ मध्ये दि सारस्वत को ऑप हौसिंग सोसायटी लि. या नावाने गांवदेवी, मुंबई येथे नोंदविण्यांत आली. श्री. एस. एस. तलमाखी हे या संस्थेचे प्रवर्तक होते.
ही संस्था इतर गृहनिर्माण संस्थांसाठी रचना आणि कामकाज या दोन्ही दृष्टीने मॉडेल म्हणून प्रेरक ठरली तरी त्यानंतर पस्तीस वर्ष दुसरी गृहनिर्माण संस्था नोंदली गेली नाही हा इतिहास आहे.
आज मात्र दिनांक ३१/३/२०१० अखेर महाराष्ट्र राज्यात एकूण २,१८,३२० सहकारी संस्था आहेत.
त्यापैकी ८१.२५५ इतक्या गृहनिर्माण संस्था आहेत.
म्हणजेच एकूण सहकारी संस्थांपैकी सगळ्यांत जास्त संख्या ज्या संस्था प्रकाराची आहे तो संस्था प्रकार सहकारी गृहनिर्माण संस्था हा आहे हा वर्तमान काळ आहे. स्वाभाविकच सगळ्यात जास्त सभासद संख्यासुद्धा कदाचित गृहनिर्माण संस्थांचीच असेल.
गृहनिर्माण संस्था हा सहकारातील असा संस्था प्रकार आहे की, जेथे संस्थेचे सभासद आपल्या कुटुंबासह अहोरात्र एकमेकांच्या निकट संपर्कात / सहवासात असतात दुसऱ्या कोणत्याही संस्था प्रकारात सभासदांचा एकमेकांशी आपल्या कुटुंबासह इतका निकटचा संबंध येत नाही.
त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारी मानवी स्वभाव, वर्तन, अहंकार, राग, लोभ यातून सुद्धा अनेकदा उद्भवलेल्या असतात असे अनुभवास येते त्यामुळे त्यांची सोडवणूक करताना केवळ कायदा पोटनियमातील तरतूदी यांचीच माहिती नव्हे तर मानवी स्वभाव वर्तनाची माहिती असणे गरजेचे आहे.
त्या अनुषंगाने वेळोवेळी गृहनिर्माण संस्थाचे प्रश्न व प्राप्त होणा-या तक्रारीच्या स्वरुपाचा अभ्यास करुन तक्रारीचे निवारण करणेसाठी करण्यांत येणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सन २००१- २००२ मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थासाठी आदर्श उपविधी तयार करण्यात आले.
तरी सुध्दा प्राप्त होणा-या तक्रारीच्या स्वरुपात फारसा फरक न पडल्यामुळे पुन्हा एकदा याबाबत आयुक्त कार्यालयाचे स्तरावर अभ्यास करण्यात येऊन आदर्श उपविधीमध्ये सुधारणा करण्यात आली. सन २००९-२०१० मध्ये नवीन आदर्श उपविधी प्रसिद्ध करण्यात आले.
वास्तविक या आदर्श उपविधीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनांशी संबंधीत सर्व मुहयांबाबत कार्यपद्धतीचे मार्गदर्शन करण्यांत आलेले आहे. तरीसुद्धा काही मुहयांवर सभासदांच्या तक्रारी वारंवार प्राप्त होतात.
सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये राहाणा-या व्यक्ति / सभासद या प्रामुख्याने शहरी भागातील असून सर्वजण कामकाजानिमित्त दिवसभर बाहेर असतात.
त्याचबरोबर अशा संस्थामध्ये दैनदिन व हिशोबी कामकाज करणेसाठी स्वतंत्र प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसतो. बहुतेक वेळा व्यवस्थापक समितीमधील सदस्यच दप्तर लिहिण्याचे कामकाज करतात.
सहकारी संस्थेमध्ये दैनंदिन कामकाजाबाबत निर्णय घेताना सहकारी कायदा, नियम तसेच उपविधीमध्ये नमुद तरतुदीनुसार निर्णय होणे आवश्यक असते.
परंतु त्यासंबंधी अर्थ लावताना तसेच संस्था स्तरावर विकासात्मक कामे करताना वेगवेगळया संस्थामध्ये वेगवेगळे निर्णय घेतले जातात व त्यामुळे तक्रारी निर्माण होतात.
Language | Marathi |
No. of Pages | 47 |
PDF Size | 0.3 MB |
Category | Government |
Source/Credits | sahakarayukta.maharashtra.gov.in |
Housing Society Rules Marathi PDF Free Download