श्री गणपती स्तोत्र – Ganapati Stotra PDF Free Download

|| श्री गणपती स्तोत्र || (Lyrics)
जय जयाजी गणपती | मज द्यावी विपुल मती |
करावया तुमची स्तुती | स्पुर्ती द्यावी मज अपार || ०१ ||
तुझे नाम मंगलमूर्ती | तुज इंद्र-चंद्र ध्याती |
विष्णू शंकर तुज पूजिती | अव्यया ध्याती नित्य काळी || ०२ ||
तुझे नाव विनायक | गजवदना तू मंगल दायक |
सकल नाम कलिमलदाहक | नाम-स्मरणे भस्म होती || ०३ ||
मी तव चरणांचा अंकित | तव चरणा माझे प्रणिपात |
देवधीदेवा तू एकदंत | परिसे विज्ञापना माझी || ०४ ||
माझा लडिवाळ तुज करणे | सर्वापरी तू मज सांभाळणे |
संकटामाझारी रक्षिणे | सर्व करणे तुज स्वामी || ०५ ||
गौरी पुत्र तू गणपती | परिसावी सेवकाची विनंती |
मी तुमचा अनन्यार्थी | रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया || ०६ ||
तूच माझा बाप माय | तूच माझा देवराय |
तूच माझी करिशी सोय | अनाथ नाथा गणपती || ०७ ||
गजवदना श्री लम्बोदरा | सिद्धीविनायका भालचंद्रा |
हेरंभा शिव पुत्रा | विघ्नेश्वरा अनाथ बंधू || ०८ ||
भक्त पालका करि करुणा | वरद मूर्ती गजानना |
परशुहस्ता सिंदुरवर्णा | विघ्ननाशना मंगलमूर्ती || ०९ ||
विश्ववदना विघ्नेश्वरा | मंगलाधीषा परशुधरा |
पाप मोचन सर्वेश्वरा | दिन बंधो नाम तुझे ||१० ||
नमन माझे श्री गणनाथा | नमन माझे विघ्नहर्ता |
नमन माझे एकदंता | दीनबंधू नमन माझे || ११ ||
नमन माझे शंभूतनया | नमन माझे करुणांलया |
नमन माझे गणराया | तुज स्वामिया नमन माझे || १२ ||
नमन माझे देवराया | नमन माझे गौरीतनया |
भालचंद्रा मोरया | तुझे चरणी नमन माझे || १३ ||
नाही आशा स्तुतीची | नाही आशा तव भक्तीची |
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची | आशा मनी उपजली || १४ ||
मी मूढ केवल अज्ञान | ध्यानी सदा तुझे चरण |
लंबोदरा मज देई दर्शन | कृपा करि जगदीशा || १५ ||
मती मंद मी बालक | तूच सर्वांचा चालक |
भक्तजनांचा पालक | गजमुखा तू होशी || १६ ||
मी दरिद्री अभागी स्वामी | चित्त जडावे तुझिया नामी |
अनन्य शरण तुजला मी | दर्शन देई कृपाळुवा || १७ ||
हे गणपती स्तोत्र जो करी पठण | त्यासी स्वामी देईल अपार धन |
विद्या सिद्धी चे अगाध ज्ञान | सिंदूरवदन देईल पै || १८ ||
त्यासी पिशाच भूत प्रेत | न बाधिती कळी काळात |
स्वामीची पूजा करोनी यथास्थित | स्तुती स्तोत्र हे जपावे || १९ ||
होईल सिद्धी षड्मास हे जपता | नव्हे कदा असत्य वार्ता |
गणपती चरणी माथा | दिवाकरे ठेविला || २० ||
|| इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण ||
गणपती स्तोत्र ( संकटनाशन स्तोत्र )
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत् संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
गणपती स्तोत्र ( मराठी अनुवाद )
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||
देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||
जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||
लेखक | – |
भाषा | हिन्दी |
कुल पृष्ठ | 6 |
PDF साइज़ | 0.3 MB |
Category | Religious |
गणपती स्तोत्र चा जप कसा करावा?
- दर मंगळवारी गणपती स्तोत्राचा जप करणे उत्तम समझले जाते.
- एका कपड्याच्या आसनावर मांडी घालून पूर्व दिशेला तोंद करून बसावे.
- जमिनीवर स्वस्तिक काढावे व त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा ग्लास ठेवावा.
- आपल्या सुविधेनुसार ५/७/११/१०८ वेळा गणपती स्तोत्राचा जप करावा.
- जप करून झाहल्या वर गणेशाचे मनपूर्वक आभार मानावे व ग्लासातले पाणी घरातल्या सर्व माणसाना तीर्थ म्हणून द्यावे.
मंगलमय वातावरणासाठी हे तीर्थ संपूर्ण घरात शिंपडावे.
श्री गणपती स्तोत्र – Ganapati Stotra PDF Free Download