युगंधर कादंबरी शिवाजी सावंत | Yugandhar Novel PDF In Marathi

युगंधर कादंबरी शिवाजी सावंत – Yugandhar Book/Pustak PDF Free Download

Credit: Maheta Publication

पुस्तक के कुछ मशीनी अंश

‘युगंधर’ शब्दरूप झाली! मन एका अननुभूत कार्यपूर्तीच्या अवर्णनीय आनंदानं कसं शिगोशीग भरून आलंय.

खरंतर या वेळी ‘मनोगत’ म्हणूनसुद्धा एकही शब्द लिहू नये, असं अबोध मनाच्या तळवटातून प्रकर्षाने जाणवतं आहे.

‘जे काय बोलायचं असेल, ते जाणत्या भारतीय मनावर गेली हजारो वर्ष निर्विवाद अधिराज्य गाजविणाऱ्या ‘काळ्याला’ त्याच्या वर्णासारख्याच गडद ‘करंद’ भाषेत मनमुक्त बोलू देत. आपण आपलं आता,

गेली तीस वर्ष हा ‘कृष्णवेध’ घेणाऱ्या थकल्या देहमनाला कथा ‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ म्हणून प्रथम पुरेसा विश्राम द्यावा.’

हे ‘आचमन’ घेताना – ‘आचमन’ हे शीर्षक लिहितानाच या मनोगताला ‘आचमन’ हे नाव का?

हे स्पष्ट करणं भाग आहे. ‘आचमन’ म्हणजे सद्हेतूनं समष्टीच्या श्रेयसासाठी, कल्याणासाठी परमशक्तीला मनोमन आवाहन करून प्राशन केलेली जलांजली!

‘युगंधर’ वाचून झाल्यावर वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय येईल, याचा श्रीकृष्णकृपेनं पूर्ण विश्वास आहे.

म्हणून तर हे मनोगताचं प्रकट-अप्रकट शब्द मिसळलेलं आचमन! या वेळी काही श्रद्धेय सुहृदांच्या तीव्र स्मरणानं लेखणी क्षणैक मुग्ध-स्तब्ध झालीय.

त्यांनी वेळोवेळी ‘कुठवर आलाय युगंधर?’, ‘कधी पडणार हातात?” अशी आत्मभावा वारंवार केलेली विचारणा ऐकताना मलाच उत्तर माहिती नसल्यामुळे देहूच्या तुक्या वाण्यासारखा माझा माझ्याशीच मूक संवाद जुंपत असे.

त्या संवादाचा कोहीच शेवट होत नसल्यामुळे काहीही उत्तर न देता, मी वरवर नुसताच हसत मौन पत्करी. त्या सुहृदांना खोटं दिलाशाचं उत्तर देण्याचं धैर्य काही माझ्याच्यानं होत नसे.

त्यांतील दोन तर ज्यांच्या बहात्तर हजार धमन्यांतून साहित्याचं आणि माणुसकीचं प्रेम अहोरात्र थडथडत होतं, असेच.

पहिले ऋषितुल्य, श्रद्धेय तात्यासाहेब! इथून तिथवर पसरलेल्या साहित्य रसिकांचे कंठमणी कविशिखर कुसुमाग्रज – वि. वा. शिरवाडकर!

दुसरे पुण्याच्या कॉन्टिनेन्टल या मराठी प्रकाशनाचे अनंतराव कुलकर्णी! ‘युगंधर’चा माझ्या पद्धतीनं सर्वांगीण अभ्यास झाला.

श्रीकृष्णचरित्राशी निगडित मथुरा, उज्जैन, जयपूर, कुरुक्षेत्र, प्रभास, द्वारका (वेरावळ), सुदामपुरी, करवीर असा शोधक प्रवास झाला. आवश्यक त्या संबंधित विद्वानांच्या मुलाखती झाल्या.

कथावस्तूला प्रत्यक्ष भिडण्यासाठी मन झट्या घेऊ लागलं. याच वेळी नाशिकच्या गोदाकाठावर भरलेल्या व्याख्यानमालेचं एक आमंत्रण आलं. आदरणीय कुसुमाग्रजांना भेटायचं, असं मनोमन योजून मी ते लगेच स्वीकारलं.

त्या वेळी आकृतिबंधाची अडचण त्यांच्यासमोर ठेवताना मी म्हणालो, “श्रीकृष्णाच्याच तोंडून आत्मचरित्र शैलीत संपूर्ण कथावस्तू बांधायची म्हणतोय.”

लेखक शिवाजी सावंत – Shivaji Sawant
भाषामराठी
एकूण पृष्ठे 702
Pdf साइज़ 7 MB
Categoryकादंबरी(Novels)

युगंधर कादंबरी शिवाजी सावंत – Yugandhar Novel Book/Pustak PDF Free Download

2 thoughts on “युगंधर कादंबरी शिवाजी सावंत | Yugandhar Novel PDF In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *