श्री दत्त महात्म्य ग्रंथ | Shri Datta Mahatmya PDF In Marathi

श्री दत्त महात्म्य ग्रंथ – Shri Datta Mahatmya Book/Pustak PDF Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

म्हणोनि नमस्कारी ।। ५६ ॥ प्रभू म्हणे हे दिले वर । तूं होसी सप्तद्वीपेश्र्र । ऐसें बोलता | योगेश्वर । फुटले सुंदर दोन भुज ।। ५७ ॥ मग प्रेमें दाटून । इढ घेई देवाचे आलिंगन । आलिंगिता द्वैतभान | जाऊन निश्चळ राहिला । ५८ ।

ओळखोनी अंतःस्थिती | वरदान आणूनी चित्तीं । त्यावरी माया सोडिती । पुनः उठविती तयातें ॥ ५९ ॥ श्रीदत म्हणे तयासी । त्वां जावोनि माहिष्मती’ । राज्याभिषेक आपणासी । करवी विधिसी मदाज्ञनें ।। ६० ।।

तथास्तु म्हणोन अर्जुन | भावें नमन करून । म्हणे शिरसा मान्य वचन | विस्मरण न व्हावें तुमचे ।॥ ६१ ॥ माझें असावें स्मरण । आपले हे चरण। हेंचि माझें जीवन । येथें प्रमाण मन तुमचें ।। ६२ ॥

जेवी बाळा सोडून । दुरावे जरी कू्मीण । त्याचें करितां स्मरण तया जीवन येतसे ।। ६३ । जीवन येतसे भक्तां । तुम्हीं मनीं आठवितां | जेवीं कूर्मिणीने विसरतां । बाळा पंचता पावती ॥ ६४ ॥

कूर्मिणीला येवो भ्रमप्रमाद । तुम्ही ईश्वर स्वच्छंद | तुम्हां न ठेवा भ्रम प्रमाद साक्षी वेद देतसे ।। ६५ | तुमचे आज्ञेकरून | जीवावरी आवरणं । घाली माया दारुण । म्हणोनी भ्रमण पावती ॥ ६६ ।।

तीच माया तुम्हांपासीं । तिचें आवरण नये तुम्हांसी । लौकिक मायेसी । उपमेय जी ॥ ६७ ॥ स्वाधीत स्वाश्रयमाया । अन्या ठेवी मोहूनियां | ती नावरी स्वाश्रया । लोकत्रया ठावें हें ॥ ६८ ॥

जैसा पाळला कुतरा । कु म्हणतां धरी परा | धन्यावरी नये त्याच्या घरा । सेवी त्यावरी न भोंके । ६९ ॥ जो होई कर तुझा भक्त । त्यापुढे माया हो अशक्त । मी तुझा भक्त व्यक्त । अव्यक्त माया काय करील ।। ७० ॥

आम्हां मायेचें नाहीं भय । आम्हां पुढे काळ काय । दैवरेषेवरी पाय । देवूं हे पाय आठवितां ॥ ७१ ॥ देवा योगक्षेमाची वार्ता । सोडूनि देवू सर्वथा । जेथें तेथें तुझ्या कथा | गाऊं माथा नम्र करूनी ।। ७२ ॥

असो आतां हैं मागणें । सर्वथा आम्हां न विसरणें। आम्हां वांचवावे स्मरणें । हें गाऱ्हाणे पुनः पुनः ॥ ७३ ॥

असें म्हणोनी अर्जुन । चाले मागे पाहून । जेवीं सासुन्या जातां सून । पुनः पुनः फिरोनि मागे पाहे ।। ७४ | स्मरण ठेवूनी अंतरंग । राजा आला रेवातीरीं । प्रवेशला माहिष्मतीपुरीं । येती सामोरी पौरमंत्री ॥

लेखक वासुदेवानंद सरस्वती टेंबे-Vasudevananda Saraswati Tembe
भाषामराठी
एकूण पृष्ठे 395
Pdf साइज़44.4 MB
Categoryधार्मिक(Religious)

श्री दत्त महात्म्य – Shri Datta Mahatmya Book/Pustak PDF Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *