नाट्यप्रसंग | Natyaprasang PDF

मराठी नाटक पुस्तक – Natyaprasang Book/Pustak PDF Free Download

संस्कृत रंगभूमीच्या विकासात विशाखदत्त, भवभूती आणि हर्ष यांनी अत्यंत मोलाची भर टाकली आहे. रंगभूमीवरील अनेक प्रचलित परंपरा नाकारून नवी वहिवाट निर्माण करण्याचा प्रयत्न या नाटककारांनी केला आहे.

विशाखदत्त हा कालिदासाचा समकालीन समजला जातो. सामान्यपणे इ.स. चौथे पाचवे शतक या काळात तो झाला असावा. एकीकडे शृंगार, करुणरसाची परंपरा असताना विशाखदत्तने शृंगार, करुणा आणि नायिकाविहीन नाटक लिहिले.

या नाटकाचे नाव आहे मुद्राराक्षस! विशाखदत्त ‘देवी चंद्रगुप्त’, अभिसारिका वजीर’ आणि ‘मुद्राराक्षस’ ही तीन नाटके लिहिलीत. मुद्राराक्षस हे त्याचे सर्वाधिक यशस्वी आणि संस्कृत रंगभूमीवरील पहिले राजकीय नाटक आहे.

संस्कृत नाट्य पंडित गो.के. भट यांनी या नाटकात चाकोरीबाहेरचे नाटक म्हटले आहे. यात विशाखदत्तने चंद्रगुप्त, चाणक्य यांना सोडून नंदाचा महामंत्री राक्षस यास नायक म्हणून उभे केले आहे.

भवभूती हा वैदर्भीय नाटककार आहे. भंडारा जिल्ह्यातील आमगाव (त्या काळचे पद्मपूर) हे त्याचे जन्मस्थळ म्हणून सांगितले जाते. ‘मालती माधव’, महावीरचरित’ आणि ‘उत्तर रामचरित’ ही त्याची नाट्यसंपदा.

इसवी सनाचे सातवे शतक हा त्याचा काळ सांगितला जातो. तो नाट्यसंयोजक, संघटक आणि दिग्दर्शकही होता. विविध यात्रांमध्ये त्याची नाटके सादर होत असे. मोठा नाट्य वर्ग त्याच्याजवळ होता.

भवभूतीने एकाही नाटकात विदूषक हे पात्र उभे केले नाही. बृहत्कथांतील कथानक निवडून संस्कृत दशरूपकांपैकी सर्वांत लोकप्रिय ‘प्रकरण’ रूपकात तो नाटकाची रचना करीत असे.

स्त्रीपात्रांविषयी त्याला सहानुभूती होती. मालती माधव’ या नाटकात तो स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न संस्कृत भाषा सोडून प्राकृत भाषेचा पुरस्कार; प्राकृत भाषेत नाट्यलेखन हा राजशेखरचा त्या काळात एक विद्रोहच होता.

नाट्यप्रेक्षक म्हणून बहुजन वर्गाचा त्याने विशेष विचार केला. म्हणून ‘सारख्या नाट्यप्रकारातून ‘लोकनाट्य” प्रकाराच्या नाटकाच्या विकासाचे मार्ग मोकळे होऊ शकले.

शिवाय ‘काव्यमीमांसा’ या ग्रंथासाठी काव्य प्रकृती, रचना, कविकार्य, कविप्रकृती आदींसंबंधीचा नवा परिपाठ त्याने ठेवला. एकूणच राजशेखर हा सुद्धा संस्कृत नाट्यपरंपरेतला बंडखोर संस्कृत नाटककार होता, असे म्हणावे लागेल.

सामान्यपणे संस्कृत नाटकांत बौद्ध पात्रे निषिद्ध मानली जात; पण भवभूतीने आपल्या ‘मालती माधव’ या नाटकात बौद्ध उपासिका काकमंदकी हिची महत्त्वाची भूमिका रेखाटली आहे. एक प्रकारे तीच या नाटकात सूत्र संचालिकेच्या रूपात दिसते.

लेखक सतीश बाबारावजी पावड़े – Sateesh Babaraoji Pavde
भाषामराठी
एकूण पृष्ठे 106
Pdf साइज़6.8 MB
Categoryसाहित्य(Literature)

नाट्यप्रसंग – Natyaprasang Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!