दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती | Kafiyats Yadis

दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती | Kafiyats Yadis Book/Pustak Pdf Free Download

पुस्तक के कुछ मशीनी अंश

इ. स. १८१८ मध्ये पेशवाई नाहींशी होऊन त्रिटिश सरकारचा अंमल झाल्यानंतर, दक्षिणेतील जहागिरदार, सरदार, इनामदार ह्यांच्या घराण्यांचा इतिहास व खानदानीची माहिती लिहून घेण्याचा प्रयत्न दक्षिणेतील पोलिटिकल एजंट ह्यांच्याकडून वेळोवेळी कर- ण्यांत आला.

सदरहू पोलिटिकल एजंट यांनी, अशा रीतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जुन्या इतिहासप्रसिद्ध घराण्याकडून जी माहिती जमविली आहे, ती ¨ दक्षिणेतील सरदारांच्या काफेयती, यादी बगरे ” या स्वरूपानं पुणे येथील एलिएनेशन दप्तरांत संग्रहित केलेली आहे.

या कैफियती व यादी पेशव्यांच्या अस्सल दारांपैकी नसून, इ. स. १८१८ नंतर त्रिटिश अमदानीमध्यें लिहिलेल्या आहेत, हें उषड आहे.

या कैफियतींमध्यें महारा- ट्रांतील बहुतेक इतिहासप्रसिद्ध जुन्या घराण्यांची माहिती असल्यामुळे,त्या मनोरंजक व उपयुक्त आहेत असें जाणून, स्वतंत्र पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यांत येत आहेत.

त्या सर्व कैफियती केवळ अस्सल कागदावरून लिहिलेल्या आहेत असें जरी नाहीं, तरी जुन्या माहितगार लोकांकडून मिळविलेली माहिती व कित्येक जुन्या घराण्यांच्या दप्तरांतील अस्सल कागदपत्रांवरून घेतलेली माहिती त्यांत मिळण्यासारखी आहे.

ज्या वेळी या कैफियती लिहिण्यांत आल्या, त्या वेळी महाराष्ट्राच्या इतिहासाची साधनें अगदी अप्रसिद्ध असल्यामुळे व लेखकवर्ग बहुतेक कारकुनी पेशाचा असल्यामुळे, या कैफियतींमध्यें इतिहास दृष्टीच्या उणीवा फार राहिल्या आहेत.

एबढेंच नव्हे तर कांहीं कैफियतींमध्यें लेखकांच्या अज्ञानामुळें धडलेले प्रमादही बरेच आहेत. तथापि, या कैकफियतींतील एकंदर माहिती अनेक दृष्टींनी उपयुक्त असल्यामुळे, त्यांची गणना

ह्यांवरून दक्षिणेतील सरदारांच्या बहुतेक घराण्यांची थोडीबहुत माहिती प्रसिद्ध होऊन, ब्रिटिश सरकारचा अंमल झाल्यानंतर त्यांची स्थिति कशी होती त्याचेंही अल्प दिग्दर्शन होतें.

या माहितीचा इतिहाससंशोधकांस व सर्वसाधा- रण लोकांस सारखाच उपयोग होईल अशी आझांस उमेद आहे. ह्या ग्रंथांतील कैफियतींचीं पांच प्रकरणें केलीं आहेतः-

१ ल्या प्रकरणांत, मराठे सर- दार, २ न्या प्रकरणांत, ब्राह्मण व इतर सरदार, ३ ग्या प्रकरणांत, स्वामी व सत्पुरुष, ४ ध्या प्रकरणांत, मुसलमान सरदार व ५ व्या प्रकरणांत, परगणे वतनदार.

मूळ कैफियतींतील भाषा जशीच्या तशीच कायम ठेविली आहे. कित्येक कैफियती फारच अशुद्ध असल्यामुळे त्यांमध्ये व्याकरणदृष्ट्या जरूर तेवढेच फेरफार केले आहेत.

या पुस्तकांत प्रासेद्ध केलेल्या कैफियतींपैकीं बहुतेक घराण्यांच्या हकिकतीच्या कैफियतींची इंग्रजी टिपणें सारांशरूपाने या पूर्वीच तयार झालेली आहेत,

लेखक राव बहादूर चिमणाजी- Rao Bahadur Chimnaji
भाषामराठी
एकूण पृष्ठे 86
Pdf साइज़22.5 MB
Categoryइतिहास(History)

दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती | Kafiyats Yadis Book/Pustak Pdf Free Download

Leave a Comment

Your email address will not be published.